मुंबई- करोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउन लावण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणा दिवसरात्र जातात आहेत. परंतु, करोना कमी होण्याची चिन्ह फार कमी आहे. बॉलिवूड इतकाच मराठी चित्रपटसृष्टीवरही करोनाचा प्रभाव पडला आहे. करोनामुळे मराठी चित्रपटसृष्टीने अत्यंत हरहुन्नरी आणि प्रतिभावंत कलाकार गमावला आहे. '' मालिकेतील कलाकाराचं करोनामुळे निधन झालं आहे. यांचं १९ मे रोजी निधन झालं असून ते मालिकेत भावे यांची भूमिकेस साकारत होते. आत्याबाईंच्या पुढे- मागे फिरणारं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. हेमंत यांना 'जीव झाला वेडापिसा' मधून लोकप्रियता मिळाली होती. आत्याबाईंच्या सेक्रेटरीचं काम पाहणाऱ्या या कलाकाराचं दुःखद निधन झालं आहे. हेमंत यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हेमंत यांना करोनाची लागण झाली होती. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास लागला. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. परंतु, काही दिवसातच हेमंत यांचं निधन झालं. हेमंत यांच्या जाण्याने मालिकेतील इतर कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेत आत्याबाईंनी भूमिका साकारले चिन्मयी सुमीतने फेसबुक पोस्ट करत हेमंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हेमंत यांच्या आठवणी सांगत चिन्मयीने लिहिलं, 'सतत वाटतंय माझ्या 'भावेंबद्दल' लिहावं त्याने ह्या दु:खाला मोकळी वाट मिळेल. पण इतकं काय काय मनात येतंय, अगणित आठवणी...अवघ्या दोन वर्षांत एखादा माणूस इतकी जागा व्यापतो तुमच्या मनात म्हणजे तो किती 'भारी' असेल. फार चटका लावताय भावे.' असं म्हणत चिन्मयीने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मालिकेतील इतर कलाकारांनीही हेमंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wovWSs