Full Width(True/False)

Video- करोना काळात तुमच्या घरात असायलाच हव्यात 'या' गोष्टी

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्गही आहे. अशात माधुरी अनेकदा तिच्या कामाचे अपडेट किंवा फोटो, व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर शेअर करते. आताही तिनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं करोना काळात आपल्या घरात कोणत्या गोष्टी ठेवणं गरजेच आहे हे सांगितलं आहे. ज्यामुळे या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करणं सोपं जाईल. माधुरी दीक्षितनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना आपल्या चाहत्यांना घरीच राहून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनं केलं आहे. ती म्हणाली, 'करोनाच्या या कठीण काळात काही गरजेचं सामान आपल्या घरातच असणं अनिवार्य आहे. जसे की, हॅन्ड सॅनिटायझर, थर्मामीटर, ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे किंवा आजारी व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल जाणून घेण्यासाठी पल्स ऑक्सी किंवा ऑक्सिमीटर, प्रत्येक व्यक्तीसाठी ग्लव्स, जर तुम्ही घरी तयार केलेले मास्क वापरत असाल तर २ मास्क वापरा किंवा मग एन९५ हा मास्क वापरा.' करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना देखील या व्हायरसची लागण झाली आहे. तर काही सेलिब्रेटींचं करोना व्हायरसमुळे निधनही झालं आहे. अशात अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरुकता परसवण्याचं काम करत आहेत. सोनू सूद, ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार, सलमान खान, अनुष्का शर्मा, रवीन टंडन यासारखे सेलिब्रेटी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f3TMvB