नवी दिल्ली : रेडमी लाइनअपमध्ये लवकरच अँड्राइड ओएसवर चालणाऱ्या एका फूल-एचडी टीव्हीचा समावेश होणार आहे. एका टिपस्टरने गुगल प्ले कंसोल लिस्टिंग आणि शाओमीच्या एक नवीन स्मार्ट टीव्हीसाठी गुगल सपोर्टेड डिव्हाइसची यादी शेअर केली आहे. यात MiTV-M00Q3 हा मॉडेल नंबर दिसत आहे. वाचाः लिस्टिंगनुसार, हा टीव्ही शाओमीच्या रेडमी ब्रँड अंतर्गत लाँच केला जाणार आहे व हा अँड्राईड टीव्ही १० सोबत येईल. अद्याप कंपनीने या टीव्हीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, कंपनीने नुकतेच चीनमध्ये Mi TV P1 series सादर केली आहे. कोडनेम ‘’ टिपस्टर मुकुल शर्माने नवीन रेडमी स्मार्ट टिव्हीसाठी गुगल सपोर्टेड डिव्हाइस आणि गुगल प्ले कंसोल लिस्टचे काही स्क्रिनशॉट्स ट्विट केले आहेत. या टीव्हीचे नाव टार्जन ठेवण्यात आले आहे आणि मॉडेल नंबर MiTV-M00Q3 आहे. गुगल प्ले कंसोल लिस्टिंग या टीव्ही मॉडेलच्या काही स्पेसिफिकेशनबद्दल माहिती देते. यात २जीबी रॅम, एक मीडियाटेक टी३१ क्वाड-कोर प्रोसेसर, Mali G52 GPU आणि फूल-एचडी (१९२०x१०८० पिक्सल) रिझॉल्यूशन असणारा डिस्प्ले मिळेल. बजेट फ्रेंडली स्मार्ट टीव्ही असण्याची शक्यता कंपनीकडून टीव्हीच्या स्क्रीन साइज, किंमत, स्पेसिफिकेशनबद्दल काहीही माहिती आलेली नाही. हा टीव्ही भारतात कधी उपलब्ध होईल याची माहिती नाही. मात्र, कथित स्पेसिफिकेशनच्या आधारावर हा टीव्ही बजेट फ्रेंडली असू शकतो. वाचाः काही दिवसांपूर्वीच भारतात Series लाँच शाओमीने आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत X सीरिजचे विक्री करतो. यात Redmi Smart TV X६५, Redmi Smart TV X५५ आणि Redmi Smart TV X५० यांचा समावेश आहे. भारतात या टीव्हींना ३२,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते. यात एचडीआप सपोर्टसह ४के डिस्प्ले मिळतो. Xiaomi ने इटलीत लाँच केली Mi TV P1 सीरिज शाओमीने इटलीत आपली Mi TV P1 सीरिजला ३२ इंच, ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंच या साइजमध्ये लाँच केले आहे. यातील ३२ इंच मॉडेल एचडी-रेडी डिस्प्लेसह येते, तर इतर मॉडेलमध्ये ४के डिस्प्ले मिळेल. इटलीत यांची सुरुवाती किंमत EUR २७९ (जवळपास २४८०० रु.) आहे. यात Google Play store, 2GB RAM आणि Quad Core MediaTek MT9611 SoCs सारखे दमदार फीचर्स मिळतात. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hoFrwL