नवी दिल्ली : प्रत्येक दिवस हा आईचाच असतो. मात्र, खास एक दिवस तिच्यासाठीच समर्पित करण्यात आलेला आहे, तो म्हणजे . दरवर्ष मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी उद्या ( ९ मे) ला हा दिवस साजरा केला जाणार आहे. अनेकजण या दिवशी आईला खास भेटवस्तू देखील देतात. काहींनी आतापर्यंत याची खरेदी देखील केली असेल. मात्र जर तुम्ही आतापर्यंत आईसाठी काहीही खरेदी केले नसेल, तर आम्ही तुम्हाला सर्वोत्तम टेक गिफ्ट्सविषयी माहिती देणार आहोत, हे तुमच्या आईला नक्कीच आवडतील. वाचाः यातील काही प्रोडक्ट्सची किंमत जास्त असली तरी हे वापरण्यायोग्य गिफ्ट नक्कीच आवडेल. या गिफ्ट्सबद्दल जाणून घेऊया. या स्मार्टफोनची किंमत ३९,९९९ रुपये आहे. लूक्सच्या बाबतीत हा फोन खूपच आकर्षक आहे. याचा डिस्प्ले देखील जबरदस्त आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. OxygenOS 11 मुळे याचा इंटरफेस देखील खूप फास्ट आहे. Oppo Enco X या ईयरबड्सची किंमत ९९९० रुपये आहे. जर तुमच्या आईला गाणी, रेडिओ ऐकण्याची आवड असेल, तर हे त्यांच्यासाठी नक्कीच चांगले गिफ्ट ठरेल. यात डायनॉडियो ट्यूनिंग आणि एएनसी सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याची ऑडिओ क्वॉलिटी देखील चांगली आहे. वाचाः Apple iPad 8th Gen या आयपॅडची किंमत २९,९९० रुपये आहे. ई-बुक्स वाचणे, चित्रपट पाहणे, व्हीडिओ कॉल्स आणि गेम खेळण्यासाठी याचा डिस्प्ले शानदार आहे. यात ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले असून, वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह अनेक दमदार फीचर्स यात मिळतील. यात रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. Tile Mate Tile Mate हे एक ट्रॅकर असून, याच्या मदतीने हरवलेल्या वस्तू शोधण्यास मदत मिळेल. याच्या एक पॅकची किंमत ३,२९९ रुपये आहे. या ट्रॅकरच्या मदतीने २०० फूटापर्यंतच्या हरवलेल्या वस्तू शोधता येतील. हे ट्रॅकर अँड्राइड आणि ओएसला सपोर्ट करते. या डिव्हाइसला दररोज वापराच्या गोष्टी जसे की चावी, बॅग किंवा घरातील अन्य वस्तूंशी जोडता येते व वस्तू सहज शोधता येतात. Mi Smart Speaker या स्मार्ट स्पीकरची किंमत ३,९९९ रुपये आहे. या स्पीकरमध्ये गुगल असिस्टेंट सपोर्ट मिळतो. हा स्पीकर तुम्ही तुमच्या आईला भेट देऊ शकता. वॉइस कमांडच्या मदतीने गाणी, न्यूज सहज ऐकता येईल. यात म्यूझिक, मीडिया, स्मार्ट डिव्हाइस, डेली ऑर्गनाइजर सारखे फीचर्स मिळतात. ब्लूटूथद्वारे वायरलेस म्यूझिक स्ट्रिमिंगची देखील सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uxlyae