Full Width(True/False)

20 Years of Lagaan: भुज जवळील गावकऱ्यांसाठी आमिर आणि आशुतोष गोवारीकरांनी केली होती 'ही' गोष्ट

ब्रिटिशांनी लादलेला जाचक शेतसारा माफ व्हावा, म्हणून गावकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध किक्रेटचा सामना खेळण्याचं स्वीकारलेलं आव्हान आणि नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा केलेला पराभव या कथानकाला यांनी 'लगान : वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया' या चित्रपटातून मांडलं. ए. आर. रहमानचं सुमधुर संगीत, क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेत गुंगवून टाकण्याचे कसब, आमिर खानसह सर्व कलाकारांची अदाकारी यामुळे 'लगान' सुपरहिट ठरला आणि आजही तो सर्वांच्या स्मरणात आहे. संकल्पना आवडली नव्हती; पण... आशुतोषने सुरुवातीला मला दोन-तीन वाक्यात 'लगान'ची संकल्पना सांगितली होती. 'एक गाव आहे. तिथे पाऊस पडत नाही. परिणामी ब्रिटिशांनी लादलेला जाचक शेतसारा माफ व्हावा, म्हणून गावकरी ब्रिटिशांविरुद्ध किक्रेटचा सामना खेळतात.' ही सिनेमाची वन लाइन मला तेव्हा तितकीशी पसंत पडली नव्हती. त्यानंतर तीन महिने आशुतोष गायब होता. तीन महिन्यांनी मला त्याचा फोन आला आणि तो म्हणाला; 'एका सिनेमाची गोष्ट ऐकवायची आहे.' तेव्हाही मी कथा ऐकण्यासाठी नकार दिला होता. पण, आशुच्या आग्रहामुळे मी सिनेमा ऐकला. त्यावेळी मला गोष्ट प्रचंड आवडली. मी त्याला म्हणालो, 'तू निर्माता शोध, मी करतो हा सिनेमा. पण, मी होकार दिला आहे हे निर्मात्याला अगोदर सांगायचं नाही. नाही तर तो सिनेमाच्या गोष्टीसाठी नव्हे तर माझ्यासाठी निर्मितीस होकार देईल.' आशुनं अनेकांना गोष्ट ऐकवली. पण, कोणी तयार होईना. दरम्यान मी दोन-तीन महिन्याच्या अंतरात पुन्हा-पुन्हा आशुला मला गोष्ट ऐकवायला सांगायचो. माझ्या आई-बाबा आणि पत्नी रिनालासुद्धा सिनेमाची गोष्ट आवडली. त्यानंतर मी आशुला सिनेमासाठी होकार दिला आणि निर्मितीचं शिवधनुष्य हाती घेतलं. यात मला रियाची साथ लाभली. शेकडो गाववाले एकत्र गात होते'घनन घनन घन...' या गाण्याचं चित्रीकरण अत्यंत आव्हानात्मक होतं. गाण्याच्या चित्रीकरणात लिपसिंक होणं खूप महत्त्वाचं असतं. सेटवर आम्ही कलाकार वगळता इतर कोणालाच गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी ते आव्हान होतं. दिग्दर्शक आशुतोषनं गाण्याच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी चित्रीकरण केलंच नाही. टेपवर गाणं लागलं आणि सर्व कलाकार, शेकडो गाववाल्यांना गाणं गायला लावलं. इतक्या वेळा गाणं पुन्हा-पुन्हा वाजवण्यात आलं की, शेवटी सर्वांचं ते पाठ झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रीकरण करण्यात आलं. आम्ही सिनेमा कधी बघणार?भुजच्या नजीकच्या खेड्यात आम्ही सिनेमांचं चित्रीकरण केलं. चित्रीकरण सुरु असताना स्थानिक गाववाले आम्हाला नेहमी विचारायचे की, 'आम्ही हा सिनेमा कधी बघणार?' त्या गाववाल्यांनी कधी चित्रपटगृह पाहिलं नव्हतं. तेव्हाच ठरवलं की सिनेमा पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांना पहिल्यांदा सिनेमा दाखवायचा. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर मी, आशु आणि सिनेमाची टीम पुन्हा त्या गावामध्ये गेलो आणि सर्वांना घेऊन भुजमध्ये असलेल्या एका सिनेमागृहात आलो. तिकडे पहिल्यांदा सर्वांना सिनेमा दाखवला. त्यांनतर तीन-चार महिन्यांनी देशभरात सिनेमा अधिकृतरित्या प्रदर्शित झाला. 'लगान ११'चा व्हॅट्सअॅप ग्रुपआमचा 'लगान ११'चा व्हॅट्सअॅपचा ग्रुप आहे. या सिनेमातील बहुतांश कलाकारांना मी त्यांच्या खऱ्या नावानं संबोधित करत नाही. तर सिनेमातील पात्राच्या नावानेच आजही हाक मारतो. दया शंकर पांडेला मी 'गोली' म्हणूनच हाक मारतो. तेसुद्धा मला आमिर म्हणून नव्हे तर 'भुवन' म्हणून संबोधतात. रिमेक केला तर..मी आणि आशु सिनेमांच्या रिमेकचे हक्क द्यायला तयार आहोत. 'लगान'चा रिमेक करणऱ्या इच्छुकांनी संपर्क साधावा. आजच्या कुशल-गुणी अभिनेत्यांच्या फळीतील रणबीर कपूर, रणवीर सिंह, विकी कौशल नक्कीच उत्कृष्टपणे भुवनची भूमिका साकारु शकतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zujbrO