Full Width(True/False)

Indian Idol 12 परीक्षकांच्या नाटकी प्रतिक्रिने चाहते भडकले

मुंबई : '' या रिअॅलिटी कार्यक्रमावरून सातत्याने विविध वादंग निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील स्पर्धकांना, त्यातील परीक्षकांना आणि निर्मात्यांना ट्रोल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी परीक्षक , यांनी किशोर कुमार यांचे गाणे अतिशय वाईट पद्धतीने सादर केले म्हणून ट्रोल करण्यात आले. स्पर्धकांच्या संबंधित ज्या काही कथा, कहाण्या दाखवल्या जातात. त्यावर हे तीनही परीक्षक अत्यंत नाट्यमय प्रतिक्रिया व्यक्त करतात. ते पाहून हे तिघेहीजण पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या प्रतिक्रियांवर मीम्स तयार होत असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिजीत भट्टाचार्यही भडकले काही आठड्यांपूर्वी 'इंडियन आयडल १२' च्या निर्मात्यांबरोबरच कार्यक्रमाचे परीक्षक आणि स्पर्धकांना ट्रोल करण्यात आले होते. त्यातही शनमुखा प्रियाला तर युझर्सने अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले होते. इतकेच नाही तर शनमुखा प्रिया आणि दानिश हे दोघेही अतिशय वाईट गात असल्याने त्या दोघांनाही कार्यक्रमातून बाहेर काढण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी नेहा कक्कर, हिमेश रेशमिया यांच्यावर चांगलेच भडकले होते. एका मुलाखतीमध्ये अभिजीत यांनी नेहा आणि हिमेश या दोघांचेही नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, ज्या लोकांनी संगीत क्षेत्रामध्ये काहीही योगदान दिलेले नाही. त्यांनी फक्त चार गाणी गायली आहेत, अशी लोक परीक्षकाच्या खुर्चीमध्ये बसवण्यात आले आहे. अभिजीत पुढे म्हणाले की, हे दोघे आत्मकेंद्री आहेत. ते फक्त स्वतःचाच विचार करता आणि त्यांचा अनुभव देखील कमी आहे. नेहा आणि विशाल लवकरच परतणार विशाल ददलानी आणि नेहा कक्कर गेल्या काही आठवड्यांपासून इंडियन आयडल १२ कार्यक्रमात दिसत नाहीत. महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन असल्याने कार्यक्रमाचे चित्रीकरण दमणमध्ये होत आहे. विशाल यांनी वृद्ध पालकांचे कारण देत तिथे जाण्यास नकार दिला होता. जोपर्यंत लॉकडाउन संपत नाही तोपर्यंत ते कार्यक्रमात परतणार नाही, असे त्यांनी एका मुलाखीमध्ये सांगितले होते. तर नेहादेखील काही कारणांमुळे दमणला जाऊ शकली नाही. परंतु आता महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणाला परवानगी दिल्यामुळे हे दोघेजण पुन्हा या कार्यक्रमात दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहेत. अभिजीत सावंतनेही केली होती टीका काही दिवसांपूर्वी एका मुलाखीतमध्ये इंडियन आयडल च्या पहिल्या पर्वाचा विजेते अभिजीत सावंतने देखील कार्यक्रमावर टीका केली होती. सध्या कार्यक्रमामध्ये स्पर्धकांच्या गाण्यावर लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या कथांवर जास्त लक्ष दिले जाते, असे मत व्यक्त केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35nEb5G