Full Width(True/False)

'या' शहरात सुरू झाले Airtel 5G नेटवर्कचे ट्रायल, 1Gbps मिळतेय स्पीड

नवी दिल्लीः भारतात ५जी नेटवर्कचे काम सुरू झाले आहे. सरकारने आतापर्यंत टेलिकॉम कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम अद्याप दिले नाही. परंतु, दूरसंचार विभाग (DoT) ने भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि Vi सारख्या कंपन्यांना 5G टेस्टिंगसाठी मंजुरी दिली आहे. आता ताज्या रिपोर्टनुसार, 3.5GHz बँडवर काम करणाऱ्या नेटवर्कचे गुरुग्राममध्ये ट्रायल सुरू करण्यात आले आहे. तसेच एका व्हिडिओत एअरटेलच्या ५जी नेटवर्कची स्पीड सुद्धा दाखवली आहे. वाचाः सायबर हबमध्ये सुरू झाले ट्रायल एअरटेलने सांगितले, गुरूग्रामच्या सायबर हब परिसरात Airtel 5G ट्रायल नेटवर्क लाइव करण्यात आले आहे. 91मोबाइल्सच्या माहितीनुसार, हे नेटवर्क 3,500MHz बँडवर ऑपरेट होत आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जबरदस्त डाउनलोड स्पीड मिळत आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार एअरटेलचे ५जी नेटवर्क 1Gbps हून जास्त डाउनलोड स्पीड देत आहे. वाचाः हे युजरने ट्विटरवर एअरटेल ५जी नेटवर्कशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात एअरटेल ५जी नेटवर्कची स्पीड टेस्ट करताना दाखवले आहे. व्हिडिओत एका व्यक्तीने OnePlus 9 सारखा फोन हातात घेतला आहे. त्यात Speedtest वेबसाइट उघडले आहे. यात एअरटेल 5G ट्रायल नेटवर्क 1,000Mbps (1Gbps) पर्यंत डाउनलोड स्पीड आणइ जवळपास 100Mbps ची अपलोड स्पीड देत आहे. वाचाः ईटी टेलिकॉमच्या माहितीनुसार, एअरटेल ५जी नेटवर्क एरिक्शन इंफ्रास्ट्रक्चर वर चालत आहे. एअरटेल आगामी काही महिन्यात देशात दुसऱ्या शहरात ५ जी टेस्टिंग सुरू करू शकते. भारतात Airtel 5G कधीपर्यंत लाँच होईल, हे अद्याप सांगता येत नाही. २४ जून रोजी होणाऱ्या वार्षिक जनरल मीटिंग (AGM)मध्ये रिलायन्स आपल्या Jio 5G नेटवर्क संबंधित घोषणा करू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TAySNK