Full Width(True/False)

सौंदर्य टिकवण्यासाठी चक्क चिखलानं आंघोळ करते अभिनेत्री

मुंबई: सध्याच्या आधुनिक युगात महिला आपलं सौंदर्य टिकून राहावं यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतात. महागड्या ब्यूटी ट्रीटमेंटपासून ते अगदी घरगुती उपायांपर्यंत सर्वकाही केलं जातं. त्यात करून जर ती बॉलिवूड अभिनेत्री असेल तर काही विचारच करायला नको. पण बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री तिचं सौंदर्य टिकून राहावं यासाठी चिखलानं अंघोळ करते. तिनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्री बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही तिनं असाच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखणंही कठीण झालं आहे. कारण उर्वशीनं संपूर्ण अंगाला चिखलाप्रमाणं माती लावलेली दिसत आहे. उर्वशीनं आपला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, 'माझा आवडता मड बाथ स्पा/ मड थेरपी... Cleopatra ला मड बाथ खूप आवडत असे आणि माझ्यासारखे तिच्या मॉडर्न चाहत्यांनाही आजही ही थेरपी आवडते. Balearic बीच रेड मड एन्जॉय करत आहे. असं म्हणतात प्रेमाची रोमन देवता व्हिनसनं याला आरशाप्रमाणे मानत असे. मिनरलयुक्त ही ओली माती त्वचेसाठी चांगली असल्याचं मानलं जातं.' उर्वशीनं पुढे लिहिलं, 'मड थेरपी आजही शरीरातील अशुद्धता बाहेर टाकण्यास मदत करते. त्वचेला मुलायम बनवते. आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. याशिवाय वेदनांपासून आराम देते.' दरम्यान सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येण्याची उर्वशीची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा आपल्या कपड्यांमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iIKxnR