Full Width(True/False)

'मेरी कोम' साठी प्रियांका चोप्रा का?अभिनेत्रीचा संतप्त सवाल

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री हिने बॉक्सिंग चॅम्पियन हिच्या आयुष्यावर आधारित 'मेरी कोम' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी प्रियांकाने बरीच मेहनत घेतली होती. चित्रपटात प्रियांकाने मणिपुरी मुलीची भूमिका साकारली होती जी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस- रात्र झटत असते. अखेर तिच्या कठोर मेहनतीने ती बॉक्सिंग चॅम्पियनचा किताब स्वतःच्या नावावर करते. प्रियांकाच्या या चित्रपटातील लुकची बरीच प्रशंसा झाली होती. परंतु, आता अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या हिने प्रियांकाच्या चित्रपटातील कास्टिंगवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. '' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये जर दाक्षिणात्य संस्कृती दाखवण्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांची निवड केली जाते तर मणिपुरी किंवा मिझोराम येथील संस्कृती दाखवण्यासाठी तिथल्या स्थानिक कलाकारांची निवड का केली जात नाही, असा सवाल लिनने विचारला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लिन म्हणाली, ''मेरी कोम' या चित्रपटाच्या पात्रानुसार चित्रपटात एखाद्या मणिपुरी मुलीला घेतलं जाऊ शकलं असतं. प्रियांकाने या चित्रपटासाठी खूप मेहनत केली आहे. ते मी नाकारत नाही. परंतु, जेव्हा मणिपूर किंवा मिझोराम येथील व्यक्तीवर चित्रपट बनवण्याची वेळ येते तेव्हा कुणा दुसऱ्याच व्यक्तीची निवड केली जाते. असं का?' 'द फॅमिली मॅन २' चं उदाहरण देत लिन म्हणाली, ''द फॅमिली मॅन २' या वेब सीरिजमध्ये तमिळ भाषा बोलणाऱ्या कलाकारांना कास्ट केलं गेलं. ही पद्धत सगळ्यांना आवडली देखील. परंतु, अशात जेव्हा उत्तर-पूर्वेकडील व्यक्तींवर चित्रपट बनवायची वेळ येते तेव्हा तिथल्या स्थानिक कलाकारांची निवड का होत नाही? जर प्रेक्षक दाक्षिणात्य संस्कृतीला इतकं महत्व देतात मग तेच महत्व उत्तर- पूर्व संस्कृतीला का मिळत नाही? अनेकदा तर काही लोकांनी मला करोना व्हायरस या नावाने हाक मारली आहे. आम्हीही याच देशातील आहोत याचा सगळ्यांना विसर पडला आहे का?' लिन २००७ साली 'ओम शांती ओम' चित्रपटात झळकली होती. त्यानंतर 'रंगून' आणि 'एक्सोन' चित्रपटातूनही लिनने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cKSxBj