Full Width(True/False)

मराठीत आपलेपणा जाणवतो, पण हिंदीत मात्र...किशोरी शहाणे यांनी शेअर केला अनुभव

मुंबई: मराठी इंडस्ट्रीतील कलाकार हिंदीकडे वळले की मराठीला विसरणार तर नाहीत ना? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण याला एक नाव मात्र कायमच अपवाद ठरलं आहे. मराठी मनोरंजनविश्वातील ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री सध्या '' या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत असल्या तरी त्यांना मराठीत काम करणं अधिक पसंत आहे. मराठी भाषा आणि मनोरंजनसृष्टी मला नेहमीच जवळची वाटते असं म्हणत त्यांनी त्यांचा मराठीत काम करण्याचा अनुभव 'मुंटा'शी शेअर केला. 'मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीमधील फरक सांगायचा तर मराठीत एक आपलेपणा जाणवतो. सेटवरील वातावरण खेळीमेळीचं असल्यामुळे खूप गप्पा होतात आणि कोणाच्या आयुष्यात काय सुरु आहे ते लगेच कळतं. आता तोच आपलेपणा मला हिंदी मालिकेतही जाणवतोय कारण इथेही मला खूपच चांगली टीम मिळाली आहे. आमच्या मालिकेत बरेच मराठी कलाकारदेखील आहेत.' अनेक मराठी सिनेमांत किशोरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. , , लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करतानाच्या जुन्या आठवणींना उजळा देत त्या म्हणाल्या, 'या कलाकारांबरोबर काम करत असताना आम्हा सर्वांचा घरोबा असायचा. एकमेकांच्या घरी जाणं व्हायचं. आजही आम्ही भेटलो की एकमेकांच्या कुटुंबियांविषयी विचारपूस करतो. आमच्या सर्वांचं एक वेगळंच कौटुंबिक आयुष्य होतं. पण आता मात्र शूट करताना सेटवर भेटणं होतं तेवढंच.' किशोरी असंही म्हणाल्या की, त्यांना मराठी पडद्यावर काम करायला पुन्हा नक्की आवडेल परंतु एखादी चांगली भूमिका कधी मिळतेय याची त्या सध्या वाट बघत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gvuCbj