Full Width(True/False)

नोकियाचे हे फीचर फोन झाले ‘स्मार्ट’, जोरात वाचून दाखवतील मेसेज; किंमत ३००० रुपये

नवी दिल्ली : ने आपले दोन नवीन 4G LTE कनेक्टिव्हिटीसह लाँच केले आहे. कंपनीने आणि ला सिंगल व ड्यूल सिम व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. कंपनीने 110 आणि Nokia 105 ला वर्ष २०१९ मध्ये लाँच केले होते. परंतु, त्यावेळी यात ४जी सपोर्ट देण्यात आला नव्हता. दोन्हीमध्ये ४जी सपोर्ट व्यतिरिक्त इतर कोणतेही खास बदल नाही. Nokia 110 आणि Nokia 105 ची भारतीय किंमत क्रमश १,४०० रुपये आणि १,१०० रुपये आहे. मात्र, आता नवीन ४जी व्हेरिएंट भारतात कधी लाँच होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. वाचाः Nokia 110 4G आणि Nokia 105 4G ची संभाव्य किंमत: कंपनीने अद्याप फोन्सच्या किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. मात्र, रिपोर्टनुसार Nokia ११० ४जी ची किंमत EUR ३९.९० (जवळपास ३,६०० रुपये) आणि Nokia १०५ ४जी ची किंमत EUR ३४.९० (जवळपास ३,१०० रुपये) असू शकते. Nokia ११० ४जी ब्लॅक, येलो आणि एक्वा रंगात येईल. तर Nokia १०५ ४जी ब्लॅक, ब्लू आणि रेड रंगात येईल. Nokia 110 4G आणि Nokia 105 4G चे फीचर्स: Nokia ११० ४जी मध्ये VGA कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत, ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळेल. यात एफएम रेडिओ आणि हँड्स फ्री म्यूझिक प्लेबॅक सपोर्ट देखील मिळेल. दोन्ही फोन्समध्ये १.८ इंचाचा TFT नॉन-टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १२०x१६० आहे. हे फोन KaiOS वर काम करत नाही. हे नियमित फोन सॉफ्टवेअरसोबत येतात. दोन्ही फोन्समध्ये Readout Assist फीचर देण्यात आलेले आहे. हे कोणत्याही टेक्स्ट अथवा मेन्यूला वाचून दाखवेल. ११० ४जी आणि नोकिया १०५ ४जी मध्ये म्यूझिक सपोर्ट देखील मिळेल. फोन ३२ जीबी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट करतात. यात एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे, जो टॉर्चचे काम करतो. टॉर्च रियर कॅमेऱ्यासोबत देण्यात आल्याने फोटो काढताना देखील मदत होईल. दोन्ही फोनमध्ये १०२० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, ही स्टँडबायवर अनेक दिवस टिकेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wvfoZn