Full Width(True/False)

'पृथ्वीराज' विरुद्ध वातावरण तापलं, जाळला अक्षय कुमारचा पुतळा

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याचा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज' ला काही संघटनांचा सुरुवातीपासूनच विरोध होत होता. परंतु, आता तो विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. चित्रपटाविरोधात प्रदर्शन आणखी वाढताना दिसतंय. सुरुवातीला करणी सेनेकडून चित्रपटाच्या नावाला विरोध करण्यात येत होता. परंतु, आता अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या सदस्यांनीही चित्रपटाला आपला विरोध दर्शवला आहे. चित्रपटाच्या नावाचा विरोध म्हणून चंदिगढ येथे अक्षयचा पुतळा जाळण्याचा प्रकार घडला आहे. करणी सेनेकडून चित्रपटाचं 'पृथ्वीराज' नाव बदलून 'सम्राट चौहान' ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. एका महिन्यापूर्वी करणी सेनेने चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी करत चित्रपटाला पृथ्वीराज यांचं संपूर्ण नाव देण्याबद्दल सुचवलं होतं. यासोबत त्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी स्क्रिनिंगची मागणी केली होती. करणी सेनेचे युवा विंगचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते सुरजीत सिंह यांनी सांगितलं, 'जर ते आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. 'पद्मावत' चित्रपटादरम्यान संजय लीला भन्साळी यांच्यासोबत जे झालं ते या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबतही होऊ शकतं.' संजय यांनी विरोधानंतर आपल्या 'पद्मावती' चित्रपटाचं नाव बदलून 'पद्मावत' केलं होतं. परंतु, अक्षयच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाचे निर्माते मात्र या संघटनांच्या मागण्या मान्य करण्याच्या विरोधात आहेत. जर वातावरण निवळलं तर 'पृथ्वीराज' येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. २०१९ मध्ये ट्वीट करत अक्षयने या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. मानुषी चित्रपटात पृथ्वीराज यांच्या पत्नीची भूमिका साकारते आहे. आदित्य चोप्रा 'पृथ्वीराज' चे निर्माते आहेत तर चंद्रप्रकाश द्विवेदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zEMIiG