मुंबई: सध्या अभिनेता यांची सुपरहिट वेब सीरिज ''चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर असलेल्या सस्पेन्स आणि अॅक्शननी भरलेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. तसंच मनोज बायपेयी यांचा 'रे' हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix)वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळं नेटफ्लिक्सनं मनोज बायपेयी यांना टॅग करत एक ट्विट केलं. नेटफ्लिक्सनं केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. इतकंच नाही तर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं या ट्विटला रीट्विट करत उत्तर दिलं आहे. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांच्या ट्विटवर प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'मनोज बायपेयी लवकरच नेटफ्लिक्सच्या चित्रपटात दिसणार आहेत.आम्हाला आनंद आहे की, आता तू आमच्या फॅमिलीचा भाग आहेस' असं नेटफ्लिक्सनं त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं देखील मजेशीर आणि तितकंच भन्नाट असं उत्तर दिलं आहे. ' श्रीकांत जॉब बदलल्यामुळे खूपचं ड्रास्टिक बदल झाला असेल ना? असं अॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं म्हटलं आहे. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन व्हिडिओच्या या ट्विट्सवर मनोज बायपेयी यांना देखील हसू आवरलं नाहीए. त्यांनी देखील यावर उत्तर दिलं आहे. ' हाहाहा..टॉप क्लास विनाद..पण मी जॉब नाही रोल बदललाय', असं मनोज बायपेयी यांनी म्हटलं आहे. 'रे' या चित्रपटाच्या चार कथांमध्ये मनोज वाजपेयी, अली फजल, के के मेनन, हर्षवर्धन कपूर आणि राधिका मदन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील चार वेगवेगळ्या कथांचं दिग्दर्शनही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलं आहे. तिसऱ्या सीझनची तयारीदोन सीझनच्या यशानंतर आता निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची तयारीही सुरू केली आहे. यावेळी श्रीकांत तिवारी आणि त्याच्या टीमसाठी पूर्णपणे नवीन मिशन असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या भागात श्रीकांत आणि त्याची टीम चीनी शत्रूशी दोन हात करताना दिसेल. तसंच 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनला करोनाकाळाची पार्श्वभूमी देण्यात येईल असं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार या सीझनची कथा ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणार आहे. 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनचं चित्रीकरण मुंबई, दिल्ली आणि काश्मीर येथे झालं होतं. तर दुसऱ्या सीझनचं शूटिंग चेन्नई, लंडन, मुंबई आणि दिल्ली येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिसऱ्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्लीच्या व्यतिरिक्त नागालँड आणि पूर्वेवकडील राज्यात करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cy4Lx1