नवी दिल्लीः टेक्नोलॉजी कंपनी गुगलने आज १२ जून रोजी इटलीच्या खगोलशास्त्रज्ञ मार्गेरीट हॅक यांच्या जन्म दिनानिमित्त एक खास डूडल साकारले आहे. या डूडल मध्ये मार्गेरीटा यांना टेलिस्कोपद्वारे आकाशाकडे पाहताना दाखवले आहे. या डूडलला अंतराळाची थीम देण्यात आली आहे. याशिवाय, डूडल वर क्लिक केल्यानंतर युजर्संना खगोलशास्त्रज्ञ मार्गेरीटा हॅक संबंधीत सर्व माहिती मिळते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः खगोलशास्त्रज्ञ मार्गेरीटा हॅक यांचा जन्म १२ जून १९२२ रोजी झाला होता. मार्गेरीटा हॅक ट्राएस्टे विद्यापीठात अस्ट्रो फिजिक्सच्या प्राध्यापक होत्या. त्यांनी ताऱ्यांची रासायनिक संरचना आणि त्यांच्यातील तापमान व गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला होता. १९७० साली मार्गेरीटा यांनी कोपर्निकस उपग्रह वरून यूवी डेटा वर काम केले आहे. याचा मुख्य उद्देश तारकीय वातावरणाच्या बाहेरील भागात होणारी उर्जावान घटना आणि मोठ्या लेवलर नुकसानीची माहिती मिळवणे हे होते. वाचाः मार्गेरीटा हॅक यांचा पहिला शोध मार्गेरीटा हॅक यांचा पहिला शोध कोपरनिकसच्या डेटावर आधारित होता. हा शोध १९७४ सीली नेचर मध्ये प्रकाशीत झाला होता. १२ जून २०१२ ला मार्गेरीटा यांना त्यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त इटली गणराज्यचा सर्वोच्च सन्मान दमा डी ग्रान क्रोस मिळाला होता. त्या विज्ञानाशिवाय, प्राध्यापक, लेखिका आणि कार्यकर्त्या होत्या. गुगलने मार्च मध्ये वसंत ऋतू च्या आगमनानंतर एक खास डूडल बनवले होते. डूडलमध्ये प्रकृतीचे जबरदस्त निळ्या, हिरव्या, लाल, पिवळ्या, गुलाबी रंगाशी जोडण्यात आले होते. याशिवाय, डूडल मध्ये रंगी बेरंगी फुले आणि एक हेजहोज जंगली उंदराला दर्शवले होते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pP7zLE