नवी दिल्ली : , आणि या कंपन्या ५६ दिवसांच्या वैधतेसह अनेक प्लान्स ऑफर करत आहेत. या प्लान्समध्ये डेटासोबत कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स देखील मिळतात. यातील काही प्लान्स स्ट्रिमिंग बेनिफिट्ससोबत देखील देतात. सर्व कंपन्यांकडे ३९९ रुपयांचा प्लान आहे. यातडेली १.५ जीबी डेटा दिला जातो. तर व्हीआयच्या एका प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज ४ जीबी डेटा मिळेल. कोणत्या कंपनीचा प्लान सर्वोत्तम आहे पाहुयात. वाचाः Airtel चा ३९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये Mobile Edition, Airtel XStream आणि Wynk Music चे सबस्क्रिप्शन मिळेल. Airtel चा ४४९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा मिळेल. तर कंपनीच्या ५५८ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळेल. इतर सर्व बेनिफिट्स ३९९ रुपयांच्या प्लानप्रमाणेच आहेत. Jio चा ३९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. यात अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. प्लानची वैधता ५६ दिवस आहे. वाचाः Jio चा ४४४ रुपयांचा प्लान जिओच्या ४४ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यात जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. कंपनीचा ५९८ रुपयांचा प्लान देखील आहे. यात ४४ रुपयांच्या प्लानचे सर्व बेनिफिट्स मिळतात. मात्र सोबतच Disney+ Hotstar VIP चे एक वर्षांचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. Vi चा ३९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळेल. प्लान विकेंड रोल ओवरडेटा, binge ऑल नाइट ऑफर आणि Vi movies and TV अ‍ॅक्सेससोबत येतो. Vi चा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्रीपेड प्लानमध्ये डबल डेटा ऑफरसह ५६ दिवसांसाठी दररोज ४ जीबी डेटा मिळेल. प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससोबत येतो. या प्लानमध्ये विकेंड रोलओवर डेटा आणि binge ऑल नाइट ऑफर मिळेल. Vi चा ५९५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. यात Zee5 premium आणि Vi movies and TV चा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. यासोबतच विकेंड रोलओवर डेटा आणि binge ऑल नाइट ऑफर मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wv5fMp