मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी ब्रिगेड परेड ग्राऊंडवर दिलेल्या भाषणामुळे भाजप नेता आणि अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याप्रकरणी आता कोलकाता पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांनी समन्स पाठवत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. या आधी कोलकाता उच्च न्यायालयानं मिथुन चक्रवर्ती यांना या प्रकरणी मोठा झटका दिला आहे. न्यायाधीश कौशुक चंद यांनी पोलिसांना मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी दिलेल्या वादग्रस्त भाषणावरून कोलकाता पोलिसांनी यापूर्वीही त्यांची चौकशी केली आहे. या वादग्रस्त भाषणानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या विरोधात मानिकलता पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्याठिकाणीही त्यांच्या पदरी निराशाच पडली. मार्च २०२१ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर निवडणुकांच्या प्रचार रॅलीमध्ये भाषण देताना त्यांनी, मी असली कोब्रा आहे. दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल. मी फक्त एक साप नाही, मी कोब्रा आहे. एका दंशात संपवून टाकेन, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले होतो. ज्यावर टीएमसी, काँग्रेस आणि डाव्या पक्षानं आक्षेप घेत ही एकप्रकारची धमकी असल्याचं म्हटलं होतं. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये मिथुन चक्रवर्ती यांचे वकील महेश जेठमलानी आणि आयन भट्टाचार्य यांनी मिथुन यांनी फक्त एक डायलॉग म्हटला होता असा युक्तीवाद केला. वास्तवाशी यांचा काहीच संबंध नाही असं म्हणत त्यांनी ही धमकी मानली जाऊ शकत नाही असंही सांगितलं होतं. मिथुन यांच्यावर मानिकतला पोलीस स्टेशनमध्ये कलम १५३अ, ५०४, ५०५ आणि १२०ब अंतर्गत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार तृणमूल काँग्रेसच्या नेत्यानी दाखल केली होती. याच भाषणात मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं की, त्यांना गरीब लोकांसाठी काही करायचं आहे त्यांची लढाई लढायची आहे. राजकारण नाही माणुसकीसाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3x5firM