Full Width(True/False)

एअरटेलचा दमदार फॅमिली प्लान, एका कनेक्शनमध्ये तीन जण घेऊ शकतात फायदा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी शानदार प्लान्स आणत आहे. यातच एअरटेलने यूजर्ससाठी '' प्लान आणला आहे. या प्लानमध्ये कंपनी एका कनेक्शनमध्ये मल्टिपल अ‍ॅड-ऑन कनेक्शन देत आहे व यात सर्वांचे बिल एकत्रच येते. या प्लानमध्ये मोफत कॉलिंग आणि डेटासोबत अतिरिक्त फेनिफिट दिले जात आहे. वाचाः 1,999 रुपयांचा एअरटेलचा प्लान हा एअरटेलचा सर्वात महागडा प्लान आहे. या प्लानमध्ये कंपनी एका प्रायमरी कनेक्शनसोबत दोन अ‍ॅड-ऑन कनेक्शन ऑफर देत आहे. हा एक पोस्टपेड प्लान आहे व नव्या अथवा जुन्या नंबरसोबत वापरता येईल. नवीन कनेक्शन घेतल्यावर कंपनी एका सिमसोबत २ मोफत अ‍ॅड-ऑन सिम देते. या प्लानमध्ये एकूण ७५ जीबी डेटा, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात यूजर्सला एक्सट्रीम बॉक्स डीटीएच सर्व्हिस देखील मिळेल. यात यूजर ४२४ रुपयांपर्यंत चॅनेल अ‍ॅड करू शकतात. वाचाः एवढेच नाही तर फायबर ब्रॉडबँड कनेक्शनसोबत यूजर्सला या प्लानमध्ये २००Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. २००Mbps चा हा ब्रॉडबँड प्लान शानदार अतिरिक्त बेनिफिट्ससोबत येतो. प्लानच्या स्बस्क्राइबर्सला कंपनी , डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपी (एक वर्ष) आणि एक्स्ट्रीम प्रीमियमचे मोफत स्बस्क्रिप्शन देते. एअरटेलचा हा सर्वात महागडा प्लान असून, कंपनी देशातील काही ठराविक शहरात उपलब्ध करत आहे. ज्या शहरांमध्ये कंपनी हा प्लान देत आहे, त्यात बंगळुरू, भोपाळ आणि दिल्लीचा समावेश आहे. तुमच्या शहरात हा प्लान उपलब्ध आहे की नाही हे तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तपासू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yUqSaq