Full Width(True/False)

लग्नासाठी सिद्धार्थला मिळाला जामिन, १० दिवसांनी परतण्याचे आदेश

मुंबई : अभिनेता याचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीला कोर्टाने गुरुवारी संध्याकाळी आंतरिम जामिन मंजूर केला. हा जामिन त्याला लग्नासाठी मानवतेच्या मुद्द्यावरून देण्यात आल्याचे कोर्टाने निकाल देताना नमूद केले. त्यानंतर २ जुलै रोजी सिद्धार्थला आत्मसमर्पण करण्याचे आदेशही कोर्टाने यावेळी दिले आहेत. सिद्धार्थने लग्नासाठी जामिन मिळावा, यासाठी काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. या याचिकेमध्ये असे नमूद केले होते की, सिद्धार्थला अटक करण्याच्या एक आठवडा आधीच त्याचा साखरपुडा झाला होता. तसेच २६ जून रोजी लग्नाची तारीखही ठरली होती. त्यामुळे त्याला लग्नासाठी अंतरिम जामिन दिला जावा, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. सिद्धार्थचा हा अर्ज कोर्टाने मानवतेच्या दृष्टीकोनातून मंजूर केला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सिद्धार्थला जामिन मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वानखेडे सांगितले की, पिठानीने केलेला जामिन अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. त्याला १० दिवसांचा आंतरिम जामिन कोर्टाने मंजूर केला आहे. लग्न झाल्यानंतर २ जुलै रोजी पोलिसांकडे पुन्हा आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, सिद्धार्थचे नाव सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाशी जोडले गेले आहे. मागच्या वर्षी १४ जूनला सुशांतच्या आत्महत्येनंतर सिद्धार्थ पिठानीनेच पंख्याला लटकलेला त्याचा मृतदेह खाली उतरवला होता. इतकेच नाही तर सुशांतच्या बेडरुमचा दरवाजा आतून लॉक असल्याने सिद्धार्थनेच चावीवाल्याला बोलावून आणले होते. सिद्धार्थच्या अटकेनंतर पुन्हा एकादा सुशांतच्या घरी काम करणारा स्टाफ केशव आणि नीरज यांचीही चौकशी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या सुरक्षा रक्षकालाही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iPXOLr