नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात सातत्याने नवनवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे. आता कंपनी आपला पहिला लाँच करत नवीन कॅटेगरीमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. रियलमी इंडिया आणि यूरोपचे यांनी कंपनीच्या पहिल्या लॅपटॉपची झलक दाखवली आहे. टीझर इमेजमध्ये दाखवण्यात आलेला लॅपटॉप मेटल बॉडीमध्ये दिसत आहे व याचा रंग सिल्वर आहे. हा अ‍ॅपलच्या मॅकबुक लाइनअपसोबत मिळता-जुळता आहे. वाचाः नावाने येऊ शकतो रियलमीचा लैपटॉप टीझर इमेजमधून समोर आलेल्या माहिती व्यतिरिक्त कंपनीने लॅपटॉपबाबत काहीही सांगितलेले नाही. टीझरसोबत माधव सेठ यांनी बाइनरी कोडसोबत एक मेसेज शेअर केला असून, ज्याचा अर्थ हॅलो वर्ल्ड आहे. काही महिन्यांपूर्वीच रियलमी बाजारात नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्याची माहिती समोर आली होती. या प्रोडक्ट्समध्ये MeowBook लॅपटॉप, आणि ग्लासेज असू शकते. त्यामुळे कंपनीकडून लाँच केल्या जाणाऱ्या लॅपटॉपचे नाव MeowBook असण्याची शक्यता आहे. शाओमी आणि रेडमीच्या लॅपटॉपसोबत टक्कर रियलमीचे अपकमिंग लॅपटॉप इंटेल किंवा AMD चिपसेट सोबत येणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका रिपोर्टनुसार, रियलमीचे लॅपटॉप अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येऊ शकतात. हे लॅपटॉप Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतील. या वर्षीच्या सुरुवातीला काही रिपोर्ट्सनुसार रियलमी जून २०२१ मध्ये नवीन लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता होती. आता टीझर इमेज समोर आल्याने कंपनी लवकरच लॅपटॉपला अधिकृतरित्या लाँच करू शकते. रियलमीचे लॅपटॉप जबरदस्त किंमतीसह बाजारात येतील व याची स्पर्धा आणि सोबत असेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3itV2vp