नवी दिल्ली. सध्या व्हॉट्सअॅप चा उपयोग केवळ चॅट करण्यासाठी किंवा व्हॉईस कॉलसाठीच केला जातो असे नाही तर यावर व्हिडीओ कॉल करणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. विशेष म्हणजे ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. व्हिडिओ कॉलसाठी एक व्यवस्थित इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. आपल्या स्मार्टफोनशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब व्हर्जनद्वारे आपण व्हिडिओ कॉल देखील करू शकता. व्हॉट्सअॅप वेबद्वारे व्हिडिओ कॉल कसा करायचा जाणून घ्यायचे असेल तर फॉलो करा या टिप्स. व्हॉट्सअॅप वेबवर असा करा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअ‍ॅप वेबवर व्हीडिओ कॉल करण्यासाठी वेब ब्राउझरमध्ये व्हेस्टॅप उघडा येथे तुम्हाला एक रूम तयार करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता आपल्या स्क्रीनवर एक पॉट-अप दिसेल, त्यावर टॅप करून पुढे जा. एक रूम तयार करा आणि ज्यांच्यासह आपण व्हिडिओ कॉल करू इच्छित आहात त्यांना लिंक पाठवा व्हॉट्सअॅपच्या व्यासपीठावर एकाहूनही अधिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, जी युजर्ससाठी अतिशय उपयुक्त आहेत. यापैकी एक म्हणजे व्हिडिओ म्यूट करण्याचे वैशिष्ट्य. हे वैशिष्ट्य मार्च २०२१ मध्ये लाँच केले गेले आहे. या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर युजर्स व्हिडिओ पाठविण्यापूर्वी त्याचा आवाज म्यूट करू शकतात. या फीचरच्या मदतीने जेव्हा व्हिडिओ दुसर्‍या युजर्सकडे पोहोचतो तेव्हा व्हिडिओमध्ये कोणताही आवाज ऐकू येत नाही. व्हॉट्सअॅपवर जाऊन हे फीचर यूजर्स वापरु शकतात. व्हिडिओ कसा म्यूट करावा कोणत्याही व्हिडिओचा आवाज म्यूट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊन ज्या वापरकर्त्यास आपल्याला व्हिडिओ पाठवू इच्छित आहात त्याचा मेसेज बॉक्स उघडावा लागेल. एकदा मेसेज बॉक्स उघडल्यानंतर गॅलरीवर टॅप करा. ज्याचा आवाज आपण म्यूट करू इच्छित आहात तो व्हिडिओ निवडा. व्हिडिओवर टॅप करताच, आपल्याला डाव्या बाजूला स्पीकर चिन्ह दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g7mvBm