नवी दिल्लीः जिओनी (Gionee) ने आपली नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. ही जिओनीची () आहे. नवीन स्मार्टवॉच गेल्या वर्षी आलेल्या ची सक्सेसर आहे. जिओनीची ही वियरेल डिव्हाइस राउंड शेप्ड डॉयल मध्ये आली आहे. स्मार्टवॉचला ३ कलर मध्ये आणले आहे. स्मार्टवॉच मध्ये रियल टाइम SpO2 मॉनिटरिंग, २४ तास रियल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप ट्रॅकिंगसारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः स्मार्टवॉचचे फीचर्स जिओनी स्मार्टवॉच ७ मध्ये १.३ इंचाचा फुल टच TFT डिस्प्ले दिला आहे. स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ ४.० सपोर्ट दिला आहे. जिओनीची स्मार्टवॉचला Android 5.1 किंवा त्यावरच्या iOS 9.0 चे ऑपरेटिंग सिस्टम वर चालणाऱ्या डिव्हाइससोबत पेयर केले जाऊ शकते. पेयरिंग केल्यानंतर युजर्स रिमोट कॅमेरा आणि कॉल अँड मेसेज साठी नोटिफिकेशन अलर्ट्स सारखे फीचर्स दिले आहेत. जिओनीच्या या स्मार्टवॉच मध्ये १३०mAhची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टवॉचला ७ दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि ४ दिवसांचा यूज टाइम आहे. वाचाः रियल-टाइम Spo2 आणि हार्ट रेट मॉनिटरिंगची सुविधा स्मार्टवॉच मध्ये उपलब्ध स्पोर्ट्स मोड युजर्संना वॉकिंग, रनिंग, सायक्लिंग, स्किपिंग, बॉस्केटबॉल, बॅडमिंटन आणि फुटबॉल सारखी अॅक्टिविटीज ट्रॅक करण्याची सुविधा देते. जिओनीच्या StylFit GSW7 स्मार्टवॉच मध्ये रियल-टाइम Spo2 आणि हार्ट रेट मॉनिटरिंगची सुविधा दिली आहे. ही स्मार्टवॉच IP-67 रेटेड वॉटरप्रूफ डिवाइस आहे. जिओनीच्या या स्मार्टवॉचवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. याच्या स्ट्रॅपवर ६ महिन्याची वॉरंटी दिली जाते. वाचाः स्मार्टवॉचची किंमत जिओनी Smartwatch 7 ची फ्लिपकार्टवर ३ हजार ९९९ रुपये किंमत आहे. ही स्मार्टवॉच टील ग्रीन, मिमी पिंक आणि मॅट ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचचा सेल १३ जूनला दुपारी १२ वाजेपासून सुरूवात होणार आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pEIGCa