नवी दिल्ली : च्या तिसऱ्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने सेलचे आयोजन करण्यात आले असून, याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ४ जूनपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या या सेलमध्ये रियलमीच्या स्मार्टफोन्सवर सूट आणि ऑफर्स दिली जात आहे. सेलमध्ये फोन्सवर ४० टक्के सूट मिळेल. साठी कंपनीने सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डसोबत भागीदारी केली आहे. ईएमआय ट्रांजॅक्शनवर ५०० रुपये अतिरिक्त सूट मिळेल. मात्र, यासाठी २० हजार रुपयांची खरेदी करावी लागेल. वाचाः रियलमीच्या कोणत्या स्मार्टफोन्सवर किती सूट ? काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला रियलमी एक्स7 मॅक्स 5G ला ऑफर्ससह फ्लिपकार्टवरून २६,९९९ रुपयात खरेदी करता येईल. स्मार्टग्रेड अंतर्गत १८,९१० रुपयात खरेदीची संधी आहे. या व्यतिरिक्त सिटी बँक डेबिट व क्रेडिट कार्डसोबत १० टक्के सूट दिली जात आहे. नो-कॉस्ट ईएमआय ऑफर अंतर्गत फोन ५ हजार रुपये प्रति महिना या नुसार खरेदी करता येईल. फोनमध्ये १२ जीबी रॅम व २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले जात आहे. फोनमध्ये ६.४३ इंच फूलएचडी+ डिस्प्ले, ४५००एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर सारखे फीचर्स आहेत. Realme X50 Pro 5G: ३०,९९९ रुपये रियलमी एक्स५० प्रो ५जी स्मार्टफोनला सिटी बँक क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. फोनला फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. हँडसेटला ५,१६७ रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत घेतल्यास १४,६०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. फोनमध्ये १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज, ६.४४ इंच फूलएचडी+ डिसिप्ले, ४२०० एमएएच बॅटरी आमि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सारखे फीचर्स मिळतात. फोनवर फ्लॅट ४० टक्के सूट मिळत आहे. वाचाः Realme Narzo 30A: ७,९९९ रुपये रियलमी नार्जो ३०ए स्मार्टफोनला ७,९९९ रुपयात खरेदी करता येईल. या फोनमध्ये ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ६.५१ इंच एचडी+ डिस्प्ले आणि ६००० एमएएच बॅटरी मिळेल. फोनला सिटी बँक क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. हँडसेटला १,३३४ रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. फोनवर ७,४०० रुपये एक्सचेंज ऑफर देखील आहे.
  • ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसरसह येणाऱ्या रियलमी८ ला १४,९९९ रुपयात खरेदी करता येईल.
  • रियलमी क्स७ ५जी स्मार्टफोनला १७,९९९ रुपयात खरेदी करता येईल. फोनमध्ये डायमेंसिटी ८०००यू ५जी प्रोसेसर आणि ५० वॉट फास्ट चार्जिंग क्षमता देण्यात आली आहे. स्मार्टफोन अपग्रेड अंतर्गत फोन १४,०१० रुपयात खरेदी करू शकता.
  • रियलमी नार्जो २० मध्ये ६००० एमएएच बॅटरी आणि ४८ मेगापिक्सल ट्रिपल सेटअप देण्यात आला आहे. फोनला ९,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. कंपनीनुसार, या फोनच्या १२ लाखांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री करण्यात आली आहे.
  • सी२५ स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएच बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी७० प्रोसेसर आहे. फोनला सेलमध्ये ९,२४९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.
  • रियलमी सी २० ला ६,७९९ रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
  • रियलमी एक्स७ प्रो ५G स्मार्टफोनला २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट असणारी स्क्रिन मिळेल.
  • रियलमी नार्जो ३० प्रो ५ जी ला १५,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. फोनमध्ये डायमेंसिटी ८०० यू ५ जी प्रोसेसर आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन मिळेल.
  • रियलमी सी १२ ला ७,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी आणि ६.५२ इंचचा एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे.
  • रियलमी एक्स३ सूपर झूम स्मार्टफोनला २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५+ प्रोसेसर आणि ६०x झूम मिळतो.
या व्यतिरिक्त रियलमी ८५G, रियलमी ८ प्रो, रियलमी सी२१, रियलमी ७ प्रो, रियलमी सी११ आणि रियलमी सी१५ ला सूटसह खरेदी करता येईल. सेलमध्ये फोन्सवर बँक ऑफरसह १० टक्के सूट, एक्सचेंज ऑफर आणि १० टक्के सूट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3imnPSw