नवी दिल्ली. ऋतू कोणताही असला तरी, घरात थंड, गार वारा प्रत्येकालाच हवा असतो. त्यात करोनामुळे, बऱ्याच लोकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. त्यामुळे ते एसी खरेदी करण्यास सक्षम नाहीत. अशात कूलर्सवर समाधान मानावे लागत आहे. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, सध्या बाजारात असे बरेच कूलर आहेत ज्यांची किंमत फारच कमी आहे आणि ते खूप प्रभावी देखील आहेत. हे मिनी कूलर्स सर्व दृष्टीने योग्य आहेत आणि त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सहज कॅरी करता येतात. पेहेल आर्टिक कूलर मिनी पोर्टेबल एअर कूलर फॅन: या कुलरची एमआरपी २,९९९ रुपये आहे. २,२५० रुपयांच्या सवलतीसह ७४९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्यात दिलेली पाण्याची टाकी ८ तास भरलेली असते. थंड, आर्द्रता आणि शुध्दीकरण यासारखे फंक्शन्स देण्यात आले आहे. यात इनबिल्ट एलईडी मूड लाइट आहे जो ७ वेग-वेगळ्या पर्यायांमध्ये येतो. हा एक वैयक्तिक स्पेस कूलर आहे. युवीआय ट्रेडर्स पोर्टेबल स्मॉल प्लास्टिक एअर कंडिशनर वॉटर कूलर मिनी फॅन: या कुलर्सची एमआरपी ९९९ रुपये आहे. ६८० रुपयांच्या सवलतीसह हा कुलर ३१९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. घरी आणि बाहेर दोन्हीसाठी हा एक योग्य पर्याय आहे. त्यामध्ये दिलेल्या बॉक्समध्ये तुम्ही बर्फ देखील ठेवू शकता. बाहेर किंवा कॅम्पिंगला जाण्यासाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. यात 1.5V ची 3 * AA बॅटरी आहे. रिचार्जेबल फॅन ओव्हल शेप डिझाइन मिनी एअर कंडिशनिंग फॅन पर्सनल स्पेस कूलर एअर कूलरः या कुलरची एमआरपी ४,३४५ रुपये आहे. १४४८. ५० रुपयांच्या सवलतीसह सह हा कुलर २,८९७ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा वैयक्तिक स्पेस कूलर आहे. कुठेही प्रवास करताना ऑफिस, रूममध्ये याचा वापर करू शकता. मुख्य म्हणजे हा रिचार्ज करण्यायोग्य कूलर आहे, म्हणून विजेबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. यात ३ स्पीड बटण आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार सेट करू शकता. फंडिन यूएसबी आणि बॅटरी पावर्ड मिनी पोर्टेबल ड्युअल ब्लोअर डेस्क टेबल एअर कूलर फॅन: या कुलरची एमआरपी ६९९९ रुपये आहे. ३०१ रुपयांच्या सवलतीत हा कुलर ३९८ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा प्रभावी कूलीन्ग्सह येतो. हायड्रो-चिल तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे. शिवाय, पर्यावरणपूरक देखील आहे. फंडिन यूएसबी आणि बॅटरी पावर्ड मिनी पोर्टेबल ड्युअल ब्लोअर डेस्क टेबल एअर कूलर अल्ट्रा क्वाड आणि पोर्टेबल आहे. तो तुम्ही सहजपणे कुठेही सोबत नेऊ शकता.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g3G7GK