Full Width(True/False)

पर्ल वी पुरीला जामीन मिळाल्याने भडकले आसाराम बापूंचे भक्त

मुंबई- छोट्या पडद्यावरील अभिनेता याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या समर्थनार्थ अनेक मोठ्या कलाकारांनी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. पोलिसांनी पर्लविरुद्ध पुरावे असल्याचा दावाही केला होता. त्यानंतर पर्लला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु, आता पर्लची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. वसई सेशन कोर्टाने अभिनेत्याला दिलेल्या जामिनामुळे आसाराम बापूंचे भक्त मात्र सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. पर्लला केवळ ११ दिवसांत जामीन कसा मिळाला, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. पर्लला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर आसाराम बापूदेखील गेली अनेक वर्ष तुरुंगात आहेत. त्यांच्यावरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांनाही पर्लप्रमाणे पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. जर या प्रकरणी पर्लला जामीन मंजूर होऊ शकतो तर बापूंना का नाही, असं बापूंच्या भक्तांचं म्हणणं आहे. त्यांनी हा पक्षपात आहे असं म्हणत न्यायव्यवस्थेवर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर बापूंचे भक्त या गोष्टीला विरोध करत आहेत. एका युझरने ट्वीट करत लिहिलं, 'आसारामजी बापू पॉक्सो कायद्यामुळे गेली आठ वर्ष तुरुंगवास भोगत आहेत. त्यांना एकदाही जामीन मिळाला नाही. परंतु, अभिनेता पर्ल वी पुरी याला फक्त १२ दिवसात जामीन मंजूर झाला. वाह रे न्यायपालिका!' तर आणखी एका युझरने ट्वीट करत लिहिलं, 'हा एक अभिनेता पर्ल वी पुरी याला जामीन मिळतो. जिथे भारताला संतांची भूमी म्हटलं जातं, तिथे त्याच पॉक्सो कायद्यांतर्गत आसाराम बापूंना जामीन मिळत नाहीये. या अर्थाने तर आसारामजी देखील गुन्हेगार नाहीयेत. भारतात न्यायव्यवस्था पैसे देऊन विकत घेता येऊ शकते. हे लाजिरवाणं आहे.' अशा प्रकारचे अनेक ट्वीट यांचे भक्त करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35nV4x2