Full Width(True/False)

...तर Oxygenसाठी मर मर करावी लागणार नाही; संतोष जुवेकरचा व्हिडिओ व्हायरल

सूरज कांबळे संवेदनशील आणि प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळख असलेला कलाकार म्हणजे . त्याचा झाड लावण्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. संतोष रोज ठाण्याच्या येऊर जंगलात पळायला जातो तिथे त्याला काही तरुण झाडं लावताना दिसली. त्यानं ते पाहिलं आणि त्यानं या कार्यात सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली. हे काम सुरू करण्याच्या एक ते दोन दिवस अगोदर त्या झाडांसाठी खड्डे निश्चित करून त्यांची जागा पहिली जाते. मग खड्डा खोदून त्यात झाडं लावली जातात. गेल्या आठवड्यापासून संतोष आणि ही तरुण मंडळी तिथे झाड लावत आहेत. पिंपळ, वड, आंबा यांसारखी झाडं लावण्याचं काम संतोष सध्या करतोय. जंगलात झाडाची वाढदेखील आपोआप होते. त्यांची रोजच्या रोज काळजी घ्यावी लागत नाही. अशी झाडं भविष्यात आपल्यालाच उपयोगी पडू शकतात. तसंच सध्याची परिस्थिती पाहता स्वतःहून पुढे येऊन झाडं लावणं गरजेचं आहे, असं संतोषला वाटतं. 'मी खरं तर त्या तरुण मुलांचे आभार मानायला हवे. त्यांनी मला ही संधी दिली. निसर्गाप्रती असलेली आपली सामाजिक जबाबदारी आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. अशा वेळी ही तरुण मंडळी आपल्याला त्या जबाबदारीची जाणीव करून देतात. झाड लावण्याचं हे काम नुकतंच सुरु झालंय. शक्य असेपर्यंत मी ते करत राहीन', असं संतोष या कार्याबद्दल सांगतो. 'हेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा!!!!खऱ्या oxygen ची काळजी घेतलीना तर कृत्रिम Oxygen साठी मर मर करावी लागणार नाही आणी तडफडून मरावंही लागणार नाही' अशी पोस्ट संतोषनं लिहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xpcsxh