नवी दिल्ली. भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लान्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरकर्त्यांना कमी किंमतीत अधिक लाभ मिळवून देतात. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठीही हे प्लान्स सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गतच बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये ४९ रुपयांचा स्वस्त प्लान आणला आहे. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह डेटा आणि एसएमएस लाभही वापरकर्त्यांना देण्यात येत आहेत. जर एखाद्या वापरकर्त्याला कॉल करण्याच्या दृष्टीने एक चांगला प्लान हवा असेल तर बीएसएनएलचा ४९ रुपयांचा प्लान ते खरेदी करू शकतात. पाहा डिटेल्स. बीएसएनएलचा ४९ रुपयांचा प्लान या प्लानची किंमत ४९रुपये आहे. यात वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सुविधा दिली जाते. यासाठी १०० मिनिटांचा टॉक टाइम दिला जात आहे. म्हणजेच, संपूर्ण वैधता दरम्यान वापरकर्ते १०० मिनिटे विनामूल्य कॉलिंग करण्यास युजर्स सक्षम असतील. तसेच २ जीबी डेटाही यात दिला जात आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांचीअसून १०० मेसेजेस देखील यात समाविष्ट आहे. जिओफोन ३९ रुपयांचा प्लान जिओबद्दल बोलायचे तर कंपनीने ३९ रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा जिओचा सर्व इन वन प्लान आहे. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दररोज १०० एमबी डेटा दिला जातो. संपूर्ण वैधता दरम्यान, वापरकर्त्यांना १४०० एमबी डेटा देण्यात येईल. यासह JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud ची सदस्यताही दिली जात आहे. कंपनीने बाय वन गेट वन ऑफर देखील जाहीर केली आहे . म्हणजेच, जर तुम्ही हा प्लान खरेदी केला तर त्याच किंमतीचा आणखी एक प्लान विनामूल्य मिळेल. एअरटेल १९ रुपयांचा प्लान १९ रुपयांच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, २ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २०० एमबी डेटा देखील यात मिळतो. व्हीआयचा १९ रुपयांचा प्लान व्हीबद्दल बोलायचे तर यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, २ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २०० एमबी डेटा देखील यात देण्यात आला आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x4YXTm