नवी दिल्लीः Google Doodle: कोणत्या दिवसाचे किती महत्त्व आहे, हे आपण एकदा विसरू, पण गुगल कधीच विसरत नाही. गुगल एक खास डूडल साकारून त्याची आपल्याला सर्वांना आठवण करून देत असतो. गुगलने आजच्या दिवशी एक खास डूडल साकारले आहे. गुगलने आज अमेरिकी अभिनेत्री, गायक, नृतिका, शर्ली टेंपलचे एनिमेटेड डूडल साकारून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. २०१५ रोजी याच दिवशी सांता मोनिका हिस्ट्री म्यूझियमने Love, Shirley Temple ची सुरुवात केली होती. ज्यात काही आठवणींच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. वाचाः शर्ली टेंपल यांचा जन्म २३ एप्रिल १९२८ रोजी कॅलिफॉर्नियात झाला होता. त्यांनी स्टँड अप अँड चीयर आणि ब्राइट आइज सह अनेक चित्रपटात काम केले. शर्ली फक्त ६ वर्ष वयाची असताना अकादमी अवॉर्ड मिळाला होता. २२ वर्ष वय असताना त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांना खूपच कमी वयात प्रसिद्धी मिळाली. वाचाः गुगलने आज श्रद्धांजली देताना म्हटले की, शर्ली टेंपल ने हॉलिवूडच्या शीर्ष बॉक्स ऑफिसच्या घसरणीनंतर आलेल्या बंदीत केवळ लाखो लोकांची मदत केली नाही तर नंतर आंतरराष्ट्रीय संबंधात आपले काम करून जगात नाव कमावले. शर्ली टेंपल यांना १९६९ मध्ये संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधीत्व म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी घाना मध्ये राजदूत आणि विदेश विभागात प्रोटोकोलची पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. १९८८ साली त्यांना मानद विदेश सेवा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pC24jm