नवी दिल्ली. कोविड- १९ पासून संरक्षण करण्यासाठी करोना लस किती महत्वाची आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सर्व नागरिकांना लवकरात- लवकर लस मिळावी यासाठी सर्वच प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने आता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने एक विशेष सेवा सुरू केली आहे ज्याद्वारे युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर फोन रिचार्ज व्यतिरिक्त कोरोना लसीची उपलब्धता याबद्दल माहिती मिळू शकणार आहे. जिओने ही खास सेवा व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून सुरू केली आहे. वाचा : रिलायन्स जिओच्या या विशेष सेवेमुळे नागरिकांना यापुढे सेशन रिफ्रेश करण्यासाठी एका-वेळच्या संकेतशब्दाची चिंता करण्याची गरज नाही आणि कोविड -१९ लस उपलब्धतेची माहिती कोणत्याही त्रासाशिवाय सहज मिळवता येईल. माहितीनुसार, जिओ चॅटबॉटच्या मदतीने आता जिओ युजर्स रिचार्ज, पेमेंट, प्रश्नांची उत्तरे आणि तक्रारी नोंदवणे अशा अनेक गोष्टी करु शकतील. तसेच, कोविड-१९ लस उपलब्धतेबद्दल माहिती मिळवू शकतील. व्हॉट्सअ‍प जिओ चॅटबॉटचा नंबर किती आहे, हा विचार जर तुम्ही करत असाल तर काळजी नको. यासाठी प्रथम आपल्याला आपल्या मोबाइल फोनमध्ये 70007770007 नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप उघडून आणि जिओ चॅटबॉट सह चॅट उघडून हाय टाइप करुन पाठवावे लागेल. चॅटबॉट इतर मोबाइल नेटवर्कवरील वापरकर्त्यांसाठी देखील काम करते. म्हणजेच इतर युजर्स देखील लसीशी संबंधित माहिती मिळवू शकतात. नोंदणी नसलेल्या क्रमांकावरून किंवा नॉन-जियो नेटवर्कवरून माहिती मिळविण्यासाठी अर्ज मिळाल्यानंतर, जियो चॅटबॉट प्रथम वापरकर्त्याची पडताळणी करेल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gmFeIa