नवी दिल्ली. जगभरातील लाखो लोक व्हॉट्सअॅपवरुन आपल्या मित्रांशी आणि जवळच्या व्यक्तींसोबत बोलतात. तुम्हीही बोलत असाल. बर्याच वेळा चॅट करत असताना काहींसोबत वाद होतात, किंवा इतर काही कारणांमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करता किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करते. अशा परिस्थितीत, काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला कुणी ब्लॉक जरी केले असेल तरी देखील तुम्ही मेसेज करू शकाल. पहिल्या पद्धतीमध्ये आपले व्हॉट्सअॅप खाते हटवल्यानंतर तुम्हाला पुन्हा साइन अप करावे लागेल. यानंतर ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्याला मेसेज पाठविण्यात सक्षम व्हाल. मात्र,असे केल्याने आपण कदाचित जुना बॅकअप गमावू शकता. फॉलो करा या टिप्स
- फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडा, सेटिंग्ज ऑप्शनवर जाऊन अकाउंटवर क्लिक करा.
- आता दिलेल्या “डिलीट माय अकाऊंट” पर्यायावर टॅप करा. हे कदाचित विचित्र वाटेल, परंतु खाते पुन्हा तयार करणे आवश्यक आहे.
- येथे आपला देश कोड (भारतासाठी +९१ ) आणि "आपला फोन नंबर टाइप करा".
- या स्टेप्स पूर्ण केल्यावर, माझे खाते हटवा बटणावर टॅप करा.
- आता व्हॉट्सअॅप बंद करा आणि ते पुन्हा उघडा. आपले व्हॉट्सअॅप खाते पुन्हा तयार करा.
- अशाप्रकारे आपण ब्लॉक पर्याय बायपास कराल आणि ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकाल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v4YkI9