Full Width(True/False)

Photos- दिशा पाटनीचं आतून घर कसं दिसतं ते पाहिलं का?

मुंबई- दिशा पाटनीने तिच्या सिनेमांमधून आणि अभिनयातून बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान मिळवलं आहे. सोशल मीडियावरही तिचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. दिशा अनेकदा तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अगदी काही मिनिटांत तिचे फोटो व्हायरल होतात. दिशाच्या अनेक फोटोंमध्ये तिच्या घराची झलकही दिसते. लाकडी फ्लोअरिंगपासून ते बाल्कनीपर्यंत आणि बेडरूमपासून ते लिव्हिंग रूमपर्यंत, आम्ही तुम्हाला दिशाच्या घराची झलक तिच्याच फोटो आणि व्हिडिओंमधून दाखवणार आहोत. दिशा 'राधे'मध्ये दिसली होती दिशाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर दिशाने अखेरचे प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमा काम केले होते. या सिनेमात सलमान खान, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. याशिवाय दिशा आता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' मध्ये दिसणार आहे. दिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती गेली अनेक वर्ष अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघेही बर्‍याचदा डिनर डेटवर, सुट्ट्यांसाठी एकत्र फिरताना दिसतात. पण दोघांनी अजूनही या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wMI0ND