Full Width(True/False)

१४ दिवसांच्या बॅटरी लाइफसोबत Realme Watch 2 आणि Watch 2 Pro लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः टेक कंपनी Realme ने आणि Watch 2 Pro ला ग्लोबली लाँच केले आहे. रियलमी वॉच 2 आणि वॉच 2 प्रो मध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, 90 स्पोर्ट मोड आणि 100 हून अधिक वॉच फेस दिले आहे. रियलमी वॉच २ प्रोला याआधी कंनीने याच महिन्यातील सुरुवातीला मलेशियात लाँच केले होते. तर वॉच २ प्रो ला कंपनीने पहिल्यांदा लाँच केले आहे. जाणून घ्या या दोन्ही वॉचच्या फीचर्स आणि खास वैशिष्ट्यांविषयी. वाचाः चे फीचर्स आणि किंमत रियलमी वॉच 2 प्रो स्मार्टवॉच मध्ये 320×385 पिक्सल रेजोल्यूशन आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस सोबत १.७५ इंचाचा रेक्टांगुलर टच कलर डिस्प्ले दिला आहे. याचे वजन ४० ग्रॅम आहे. ग्राहकांना दोन स्ट्रॅप कलर मध्ये या स्मार्टवॉचला खरेदी करता येईल. या सिल्वर किंवा ब्लॅक कलर मध्ये खरेदी करता येईल. Realme Watch 2 Pro हार्ट रेट, SpO2 लेवल, झोप, स्टेप्स, कॅलरी आणि डिस्टेंसला मोजू शकते. तर या स्मार्टवॉचच्या अन्य फीचर्स मध्ये म्यूझिक कंट्रोल, रिमोट कॅमेरा, फाइंड फोन, स्टॉपवॉच, कॉल नोटिफिकेशन, मेसेज रिमाइंडर, नो डिस्टर्ब मोड सोबत येते. स्मार्टवॉच कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ v5 चे सपोर्ट करते. पॉवरसाठी 390mAh ची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १४ दिवसाची बॅटरी बॅकअप मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यूकेत याची किंमत ६९.९९ यूरो म्हणजेच ६ हजार २०० रुपये आहे. वाचाः Realme Watch 2 चे फीचर्स या स्मार्टवॉच मध्ये १.४ इंचाचा डिस्प्ले आणि 320×320 पिक्सेल रिझॉल्यूशन सोबत येते. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी याला IP68 रेटिंग मिळाली आहे. प्रो २ मॉडल सुद्धा रीयल-टाइम हृदय गति, रक्त ऑक्सीजन स्तर (एसपीओ 2), झोपेची पॅटर्नवर लक्ष ठेवते. या वॉचमध्ये पॉवर साठी 315mAh ची बॅटरी दिली आहे. १२ दिवसापर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. Realme Watch 2 ची किंमत अद्याप समोर आली नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TCJ8ol