नवी दिल्लीः २०२१ चे पहिले सूर्यग्रहण आज गुरुवारी दिसणार आहे. या दरम्यान, चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान, येणार आहे. तिन्ही खगोलीय पिंड एक दुसऱ्यासोबत एका लाइन मध्ये येतील. ज्यात सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अडथळा येईल. Timeanddate.com वरून माहिती होत आहे की, १० जून रोजी सूर्य ग्रहण दुपारी १.४२ वाजता सुरू होणार असून भारतात सायंकाळी ६.४१ पर्यंत चालणार आहे. वाचाः सूर्यग्रहण 'रिंग ऑफ फायर' म्हणून ओळखले जाते. नासाच्या माहितीनुसार, कॅनाडा, ग्रीनलँड आणि रशियातील काही भागात सूर्यग्रहण दिसेल. नासाने यावर माहिती देताना सांगितले की, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि टोरंटो सारख्या काही देशात थोडे फार सूर्यग्रहण दिसणार आहे. भारतात संपूर्णपणे दिसणार नाही. लडाख आणि अरुणाचल प्रदेश मधील काही भागात सूर्यग्रहण दिसणार आहे. तर अन्य भागात ते दिसणार नाही. परंतु, वर्षाचे पहिले सूर्यग्रहण जर तुम्हाला पाहायचे असेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, आता कोणीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून 'रिंग ऑफ फायर' पाहून शकता. वाचाः खरं म्हणजे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षितता म्हणून सूर्यग्रहण पाहणाऱ्याला चश्माचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात काही उपलब्ध आहेत. अनेक यूट्यूब चॅनेल आहेत. ज्यावर सूर्यग्रहणला लाइव्ह स्ट्रीम करतात. आम्ही काही तुमच्यासाठी चॅनेलची यादी दिली आहे. पाहा. हे २०२१ चे पहिले सूर्यग्रहण आहे. यानंतर ४ डिसेंबरला दुसरे सूर्यग्रहण आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wcl2PM