Full Width(True/False)

बहुप्रतिक्षित Samsung Galaxy M32 ‘या’ तारखेला भारतात होणार लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगचा Galaxy M32 हा मिड-रेंज भारतात लाँच होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता इंडियाच्या साइटवर साठी लँडिंग पेज बनवण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमधून फोनच्या लाँचिंग तारखेसोबतच डिझाइन आणि मुख्य स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. वाचाः लिस्टिंगनुसार, स्मार्टफोन भारतात २१ जूनला दुपारी १२ वाजता लाँच होईल. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. फोनच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर यात U-शेप नॉच आणि फोन थोडा जाड आहे. फोनचे रियर पॅनेल टेक्सचरसोबत येते व यावर एलईडी फ्लॅशसोबत स्क्वेअर शेअप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनच्या डाव्या किनाऱ्यावर पॉवर बटन देण्यात आले आहे, जे फिंगरप्रिंट सेंसर म्हणून देखील काम करते. फोन निळ्या आणि काळ्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. Samsung Galaxy M32: स्पेसिफिकेशन्स Galaxy M32 मध्ये ६.४ इंच एमोलेड डिस्प्ले मिळेल. स्क्रीन फुलएचडी+ रिझॉल्यूशन, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ८०० nits ब्रायटनेससोबत येते. वाचाः पॉवरसाठी फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. मात्र याच्या चार्जिंग सपोर्टबाबत माहिती समोर आलेली नाही. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि रियर पॅनेलवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की यात हीलियो जी८० किंवा हीलियो जी८५ चिपसेट मिळेल. फोनला ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज किंवा ६ जीबी रॅम + १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजसह लाँच केले जाऊ शकते. फोनला १५ ते २० हजार रुपये किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wiIYkC