Full Width(True/False)

प्रतिक्षा संपली! लाँच होणार TCL चे Google TV पॉवर्ड स्मार्ट टीव्ही, मिळेल ८K व्हिडीओ सपोर्ट

नवी दिल्ली : भारतासह जगभरात जबरदस्त लाँच करणारी लोकप्रिय कंपनी लवकरच ग्राहकांसाठी खास पॉवर्ड स्मार्ट टीव्ही सादर करणार आहे. पुढील महिन्यात अथवा ऑगस्टमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही लाँच करू शकती. ही सीरिज साउंड आणि पिक्चर क्वालिटीच्या बाबतीत जबरदस्त असेल. टीसीएलच्या अपकमिंग पॉवर्ड स्मार्ट टीव्हीला ४३ इंच पेक्षा अधिक आकारात लाँच केले जाईल. यात ५० इंच, ५५ इंच, ६५ इंच किंवा त्यापेक्षा मोठी साइज असू शकते. वाचाः जानेवारीमध्ये सर्वात प्रथम Google TV पावर्ड TCL स्मार्ट टीव्ही लाँच होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या टीव्हीच्या लाँचिंगची वाट बघितली जात आहे. ही स्मार्ट टीव्ही सीरिज सर्वात प्रथम अमेरिकेत देखील लाँच केली जाणार असल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले होते. मात्र, आता ही सीरिज भारतात देखील लाँच होणार असल्याचे समोर आले आहे. गुगल टीव्हीचे व्हाइस प्रेसिडेंड शालिनी गोविल पाई यांच्यानुसार जुलै अथवा ऑगस्टमध्ये या टीव्हींना लाँच केले जाईल, जे लूक आणि फीचर्सच्या बाबतीत खूपच जबरदस्त असतील. वाचाः शानदार डिस्प्ले टेक्नोलॉजी स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये जगभरात आपले स्थान निर्माण करणाऱ्या टीसीएलने जानेवारीमध्ये माहिती दिली होती की, लवकरच गुगल टीव्हीसोबत MiniLED, QLED आणि ८K रिझॉल्यूशन डिस्प्लेसह येणारी स्मार्ट टीव्ही सीरिज लाँच केली जाईल. गुगल काही आठवड्यात गेम स्ट्रिमिंग सर्व्हिस सुरू करणार आहे. या सर्व्हिसला गुगल टीव्हीवर क्रोमकास्टद्वारे वापरता येईल. गुगल अँड्राइड टीव्हीला गुगल टीव्हीमध्ये बदलण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, टीसीएल स्मार्ट टीव्हीची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होते. कमी किंमतीत शानदार टेक्नोलॉजीसह येणाऱ्या या कंपनीच्या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीसाठी अनेकदा ऑनलाइन शॉपिंग साइटवर सेल सुरू असतो. आता गुगल टीव्ही पॉवर्ड स्मार्ट टीव्ही कंपनीने आणल्यास लोकांची पसंती मिळू शकते. कंपनी या सीरिजला कोणत्या प्राइस रेंजमध्ये सादर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cPFYES