Full Width(True/False)

लावाच्या ‘या’ फोनमध्ये मिळणार Android 11, अपडेटसोबत येणार धमाकेदार फीचर्स

नवी दिल्ली : भारतीय मोबाइल कंपनी लावाने आपल्या Z2, Z4, Z6 आणि MyZ ट्रिपल-कॅमेरा व्हेरिएंटसाठी अपडेटची घोषणा केली आहे. अपडेटला २५ जुलैला Z4, Z6 आणि MyZ मॉडेलसाठी रोल आउट केले जाईल. त्यानंतर झेड२ यूजर्सला अपडेट मिळेल. वाचाः Z-सीरिजसाठी लावाचे Android 11 अपडेट , Z4, Z6, आणि My Z ला यावर्षी जानेवारीमध्ये अँड्राइड १० ओएससोबत लाँच करण्यात आले होते. नवनीन सॉफ्टवेअर अपडेट यूजर्ससाठी OTA स्वरूपात जारी केले जाईल, जे नॉटिफिकेशनद्वारे मिळेल. यूजर्स त्वरित डाउनलोड करू शकतात किंवा नंतर सेटिंगमध्ये जाऊन देखील अपडेट करता येईल. अपडेटमध्ये काही बदल आणि नवीन फीचरचा दावा करण्यात आला आहे. यात स्क्रीन रेकॉर्डिंग, चॅट बबल, डार्क मोड शेड्यूलिंग आणि डिजिटल वेलबिइंग सारख्या सुविधांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नवीन अँड्राइड यूजर्स प्रायव्हेसी, उत्तम मीडिया कंट्रोल, एक कन्व्हर्सेशन आणि नॉटिफिकेशन मॅनेजर स्वरूपात येईल. वाचाः अँड्राइड ११ अपडेट उशीरा लाँच करणाऱ्यांपैकी एक कंपनी आहे. अँड्राइड ११ ला गेल्यावर्षी लाँच करण्यात आले होते. हे अपडेट फोनमध्ये प्री-इंस्टॉल असायला हवे होते, मात्र यूजर्सला आता अपडेट करावे लागत आहे. लावाने माहिती दिली की, भारतीय इंजिनिअर्सने ANDROID R साठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. &D ने यूजर्सला अँड्राइड अपग्रेड दिले आहे. ब्रँड भविष्यात देखील याप्रकारे अपडेट जारी करणार आहे. अपडेटनंतर मिळणार हे फीचर
  • तीन नॉटिफिकेशन कॅटेगरी: कन्वर्सेशन, अलर्टिंग आणि सायलेंट
  • इन-बिल्ट स्क्रीन रेकॉर्डर
  • मीडिया कंट्रोल : अँड्राइड ११ सोबत मीडिया प्लेयर वापरण्यासाठी सेटिंग्समध्ये शॉटकट मिळेल.
  • One time permission आणि ऑटो-रीसेट: यात यूजर त्या अॅप्सला परमिशन देऊ शकतात, ज्यात माइक, कॅमेरा अथवा लोकेशन अॅक्सेसची आवश्यकता आहे. अॅप बंद केल्यावर अॅक्सेस देखील बंद होईल.
  • चॅट बबल कन्वर्सेशनला पिन करण्याची सुविधा, जेणेकरून इतर अॅप्स आणि स्क्रीनच्या टॉपवर दिसेल.
  • स्मार्ट रिप्लाय आणि स्मार्ट फोल्डर, फिटनेस, फूड, गेम्स इत्यादी फोल्डर्स अॅप्समध्ये व्यवस्थित करता येतील.
  • स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम सारखे थर्ड पार्टी फोटो शेअरिंग अॅपसाठी उत्तम सपोर्टसह कॅमेरा परफॉर्मेस ऑप्टिमाइजेशन मिळेल.
  • डार्क मोड, डिजिटल वेलबिइंगला शेड्यूल करू शकता.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3io61F1