Full Width(True/False)

यापेक्षा स्वस्त काहीच नाही! जिओच्या ‘या’ प्लानमध्ये डेटा-कॉलिंगसह मिळेल ३ ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांना अनेक अंतर्गत सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. मात्र, कंपनीच्या फक्त ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये , आणि Disney+ Hotstar VIP चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटा देखील मिळेल. वाचाः जिओचा ३९९ रुपयांचा एक पोस्टपेड प्लान आहे. एक बिल साइकिल वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर प्रति जीबीसाठी १० रुपये आकारले जातात. यासोबतच, यात २०० जीबी डेटा रोलओवर, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील मिळेल. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या हिशोबाने तुम्ही प्लानद्वारे पैशांची बचत करू शकता. हा प्लान घेतल्यानंतर तुम्हाला वेगळे ओटीटी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही. यासोबतच, , JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय ९९ रुपयांचे जिओ प्राइमचे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. वाचाः जिओचा १९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये कोणतेही ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. मात्र, हा एक बजेट फ्रेंडली प्लान आहे. एक बिल साइकिल वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये २५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर २० रुपये प्रति जीबी हिशोबाने शुल्क आकारले जाते. यासोबतच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन यात मिळेल. ९९ रुपयांच्या जिओ प्राइमचे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळेल. तसेच, प्लानमध्ये १०० टक्के रिफंडेबल सिक्योरिटी डिपॉजिटची सुविधा आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kvOtcK