Full Width(True/False)

Oppo Reno 6 Pro चा पहिला सेल आज, खरेदीवर ११,००० रुपयांपेक्षा अधिक सूट मिळविण्याची संधी, पाहा ऑफर

नवी दिल्ली. , Reno 6 प्रो मॉडेल, फ्लॅगशिपचा सेल आज फ्लिपकार्टवर सुरू होत आहे. Oppo चा हा सुपरफोन दुपारी १२ वाजेपासून बम्पर सवलतीसह आणि ऑफर्ससह तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येईल. अलीकडेच, Oppo Reno 6 मालिकेचा हा फोन भारतात ३९,९९० रुपयांमध्ये लाँच करण्यात आला. फ्लिपकार्टवरील पहिल्या सेलमध्ये तुम्हाला कॅशबॅक आणि अटी व शर्तींसह केवळ २८,७९१ रुपयात मिळू शकेल. Oppo चा हा स्मार्टफोन उत्कृष्ट लूक आणि दमदार वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. वाचा: Oppo Reno 6 Pro किंमत आणि ऑफर Oppo Reno 6 Pro 5 G १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. जर तुम्हाला आज पहिल्या विक्रीमध्ये Oppo Reno 6 Pro 5 G खरेदी करायचा असेल तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक तसेच कोटक बँक क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला ४००० रुपयांचे इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकेल. ही ऑफर ३० जुलैपर्यंत असेल. यासोबतच चांगली ऑफर अशी आहे की, जर तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून Oppo Reno 6 Pro साठी पैसे भरले तर तुम्हाला १५ % कॅशबॅक मिळू शकेल, म्हणजेच या फोनची किंमत ६००० रुपयांपेक्षाही पेक्षा कमी होईल. बजाज फिनसर्व्ह कार्डवर ४००० कॅशबॅकदेखील उपलब्ध आहे. Oppo Reno 6 5G स्पेसिफिकेशन Oppo Reno 6 Pro भारतात ऑरोरा कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी + कर्व्ह्ड एमोलेड डिस्प्ले आहे, जो ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि १०८०x२४०० पिक्सल स्क्रीन रिझोल्यूशनसह सुसज्ज आहे. ओप्पोने हा फोन अँड्रॉइड ११ बेस्ड कलरओएस ११.३ सह सादर केला आहे आणि हा १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. Oppo Reno 6 Pro 5 G एक अतिशय पावरफुल मीडियाटेक डायमेन्सिटी १२०० एसओसी प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. Oppo Reno 6 Pro कॅमेरा आणि बॅटरी Oppo Reno 6 Pro चा कॅमेरा जबरदस्त आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर असलेला क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा आहे. ओप्पोच्या या भव्य फोनला ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी W ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि ओप्पोचा दावा आहे की, चार्ज करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. Oppo Reno 6 Pro 5 G मध्ये इतरही अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत, जी युजर्सना आवडतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hSx77W