Full Width(True/False)

'आपल्या करिअरचं काय सांगता येत नाही, सेव्हींग पाहिजेच', सचिन पिळगावकर यांचं वक्तव्य

मुंबई- बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. गेली अनेक वर्ष त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांना करोना झाल्याचं निदान झालं आणि त्यांना इस्पितळात भरती करावं लागलं. त्यानंतर मात्र सविता यांनी आपण आर्थिक अडचणीत असल्याचं सांगितलं. मराठमोळे अभिनेते यांनी सविता यांच्या परीस्थितीवर भाष्य करत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरचा काहीच भरोसा नसून काही पैसे जवळ असणं गरजेचं असल्याचं सचिन यांनी म्हटलं. सविता यांना CINTAA द्वारे मदत देण्यात आली होती परंतु, ती मदतही अपुरी असल्याचं सविता यांनी सांगितलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी म्हटलं, 'मला वाटतंय की चित्रपटसृष्टीतील संस्थांनी एकत्र येऊन त्यांची मदत केली पाहिजे. CINTAA पर्यंत अजून गोष्ट पोहोचली नसावी किंवा त्यांची मदत अपुरी असावी. दुसऱ्यांना दोष देणं सोपं असतं. पण जेव्हा आपण दुसर्यांकडे बोट दाखवतो तेव्हा बाकीची चार बोटं आपल्याकडे असतात. मी कोणाला दोष देत नाहीये. कोणत्याही कलाकाराला दोष देत नाहीये. पण आपल्या आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. स्वतःजवळ पैसे ठेवणं खूप गरजेचं आहे. सेव्हींग असलीच पाहिजे.' सचिन पुढे म्हणाले, 'तुम्हाला तुमची सेव्हींग ठेवलीच पाहिजे. कधीही काहीही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुम्हाला या गीष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्या करिअरचा काहीच भरोसा नाही. पैसे वाचवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा अशी एखादी गोष्ट होते तेव्हा लोक त्या कलाकारालाच दोष देतात की त्याने स्वतःवर ही वेळ येऊ दिली. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.' त्यासोबत सचिन यांनी तरुण मुलामुलींना वायफळ खर्च न करण्याचा सल्ला दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kwc0dI