Full Width(True/False)

घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा प्रेमात; बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटचे फोटो झाले व्हायरल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण आपल्या लव्ह लाइफमुळे मात्र ती सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या मिनिषा लांबानं काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा प्रेमात असल्याचं मान्य केलं होतं. पती रयान थामशी घटस्फोट झाल्यानंतर मिनिषा पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. त्यानंतर आता मिनिषा आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिनिषा लांबाच्या नव्या बॉयफ्रेंडबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेस आकाश मलिका याला डेट करत असल्याचं मिनिषानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. मिनिषानं आकाशसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती आकाशच्या हातात हात घालून कॅन्डल लाइट डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार मिनिषा आणि आकाश २०१९ मध्ये एका पोकर चॅम्पियनशिपच्या वेळी भेटले होते. आकाश दिल्लीतील एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. पण त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मिनिषानं पुन्हा एकदा प्रेमात असल्याचं मान्य केलं होतं. ती म्हणाली होती, 'हो मी पुन्हा प्रेमात आहे आणि खुश आहे. पण माझ्या बॉयफ्रेंडचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही.' सध्या आकाश आणि मिनिषा लांबा गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करत आहे. मिनिषा लांबानं या मुलाखतीत आपल्या घटस्फोटावरही भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती, 'घटस्फोट घेणं सोपी गोष्ट अजिबात नाही. पण जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा ते सोडून दिलेलंच चांगलं असतं. लग्न किंवा कोणतंही नातं तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं असू शकतं पण ते आयुष्यभरासाठी असू शकत नाही. पण दुर्दैवानं स्त्रीयांची ओळख ही त्यांची नाती आणि वैवाहिक जीवनावरून होते. पण आता परिस्थिती बदलत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xThgM8