मुंबई : एकता कपूरची 'पवित्र रिश्ता' ही मालिका २००९ मध्ये प्रसारित झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवची जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. मानवची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने तर अर्चनाची भूमिका हिने साकारली होती. या मालिकेलाही खूपच लोकप्रियता लाभली. पवित्र रिश्ता मालिकेचे १४२४ भाग प्रसारित झाले होते. ओटीटीवर रिलीज होणार आता या मालिकेचे दुसरे पर्व म्हणजेच 'पवित्र रिश्ता २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मालिकेत अंकिता लोखंडे आणि इतर काही जुने कलाकार पुन्हा दिसणार आहेत. परंतु सुशांतने साकारलेली मानवची भूमिका आता साकारणार आहे. भूमिका करू नकोस, अनेकांनी दिला सल्ला पवित्र रिश्ता २ मध्ये मानवच्या भूमिकेतील शाहीरचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'अनेकांनी मला तू ही भूमिका साकारू नको असा सल्ला दिला होता,' असे मनोगत शाहीरने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले होते. तो या मुलाखतीमध्ये म्हणाला की, 'जेव्हा मानव या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा होकार द्यायचा की नाही याचा मी विचार करू लागलो. तेव्हा अनेकांनी मला ही भूमिका साकारण्याबाबत अनेक प्रश्न विचारले. कारण सुशांतने साकारलेली ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या माझ्याकडूनही खूप अपेक्षा असणार हे स्वाभविक होते. त्यामुळे ही भूमिका करावी की नाही याबाबत मी खूप संभ्रमात होतो. त्यात अनेकजण मला याबाबत सातत्याने प्रश्न विचारत असल्याने मी अधिक नर्व्हस होऊ लागलो. खरे तर प्रेक्षक मला स्वीकारतील की नाही, हा प्रश्न सगळ्यात आधी माझ्या मनात आला होता.' आव्हान म्हणून साकारतोय मानव शाहीरने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, 'याआधी मला महाभारतामधील अर्जुनाची भूमिकेविषयी विचारले होते. तेव्हा देखील अशीच परिस्थिती होती. त्याहीवेळी मला असे वाटले होती की ही भूमिका मी साकारू शकणार नाही. कारण माझ्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असणार होत्या. तेव्हा माझ्या मनाला मी समजावले की प्रयत्न केल्याशिवाय हार मानणे योग्य नाही. त्यामुळेच जेव्हा मानवची भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा देखील माझ्या मनात असेच विचार आले होते. प्रयत्न केल्याशिवाय हार मानणे योग्य नाही. त्यामुळेच ही भूमिका साकारण्याचे मी ठरवले.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Uldexo