मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले होते. सुरेखा यांच्या निधनाची जेव्हा बातमी आली तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. प्रेक्षकांच्या लाडक्या असलेल्या 'दादी सा' सुरेखा यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या होत्या. सुरेखा यांना अभिनयासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. व्हिलचेअरवर बसून आल्या सुरेखा सुरेखा सीकरी यांची तब्येत २०१८ पासून बिघडली होती. २०१९ मध्ये सुरेखा यांना '' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार घेण्यासाठी सुरेखा व्हिलचेअरवर बसून गेल्या होत्या. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'बधाई हो' या सिनेमामध्ये सुरेखा यांनी दुर्गादेवी कौशिक ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांचे भरभरून कौतुक झाले होते. याच भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार घेण्यासाठी त्या व्हिलचेअरवर बसून गेल्या होत्या. त्या जेव्हा स्टेजवर गेल्या तेव्हा उपस्थितांनी सुरेखा यांचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. हे पुरस्कार घेतानाचे त्यांचे फोटो तेव्हा सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. त्यानंतर हळूहळू सुरेखा यांची तब्येत बिघडत गेली. व्यक्तिगत जीवनातही होत्या बाणेदार दरम्यान, जान्हवी कपूर स्टारर 'घोस्ट स्टोरी' या वेब सीरिजमध्ये सुरेखा यांनी काम केले होते. घोस्ट स्टोरीज २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. सुरेखा यांनी अभिनय केलेली ही शेवटची कलाकृती होती. त्यानंतर सुरेखा यांची तब्येत अधिकच ढासळली गेली. ८ सप्टेंबर २०२० मध्ये त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक झाला. याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. या दोन्ही ब्रेनस्ट्रोकमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. सुरेखा यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. तब्येत सुधारल्यानंतर सुरेखा यांना डिस्चार्ज देण्यात आला. सुरेखा यांच्या अंतीम काळामध्ये त्याांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांच्यावर उपचारांसाठी दर महिन्याला दोन लाख रुपये खर्च व्हायचे. परंतु त्यांनी कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही. मला कुणाचेही उपकार नकोत, मला काम द्या आणि त्याचा मोबदला द्या असा त्यांचा बाणा अखेरपर्यंत होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3esiiqC