Full Width(True/False)

गुगलचे नवीन अपडेट, आता १५ मिनिटात सर्च केलेला डेटा २ क्लिकमध्ये होईल डिलीट

नवी दिल्लीः Google आपल्या सर्च ऑप्शनमध्ये एक नवीन अपडेट घेवून आले आहे. या फीचर द्वारे आता युजर्संना १५ मिनिटात सर्च केलेली हिस्ट्री दोन क्लिक मध्ये म्हणा किंवा अवघ्या काही सेकंदात डिलीट करता येणार आहे. गुगलचे हे नवीन फीचर सध्या केवळ iOS यूजर्ससाठी गुगल अॅप मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या वर्षीच्या अखेरपर्यंत या फीचरला अँड्रॉयड डिव्हाइस मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हे फीचर गुगलच्या ऑटो डिलीट हिस्ट्री फीचरचा विस्तार आहे. याची घोषणा गेल्यावर्षी करण्यात आली होती. या फीचरचा फायदा त्या युजर्संना होणार आहे. जे आपला फोन दुसऱ्या लोकांसोबत शेयर करतात. तसेच कुणाला माहिती होऊ नये की आपण काय सर्च करीत आहोत. हे फीचर आल्यानंतर युजर्संना हिस्ट्री मॅन्यूअली डिलीट करावी लागणार नाही. वाचाः असे २ क्लिकमध्ये हटवा आपली १५ मिनिटातील हिस्ट्री यासाठी सर्वात आधी गुगल अकाउंट मेन्यू मध्ये जा. आपल्या आयकॉन किंवा प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा. तुम्हाला या ठिकाणी एक नवीन क्विक डिलिटचे ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्हाला 'Delete last 15 minutes' लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही तुमची हिस्ट्री डिलीट करू शकता. वाचाः याच पद्धतीने गुगलच्या युजर्स Google Assitant ला व्हाइस कमांड देवून हिस्ट्री डिलीट करू शकतो. यासाठी तुम्हाला Hey Google गेल्या आठवड्यात मी जे सर्च केले ते सर्व डिलीट कर. असे बोलू शकता. जर या फीचरला ऑन करीत असात तर तुम्हाला एक ऑटो डिलीट पर्याय मिळेल. जो तुम्हाला ३ महिने, १८ महिने, आणि ३६ महिन्याचा समावेश आहे. याचाच अर्थ सर्च रिझल्ट प्रत्येक ३, १८, किंवा ३६ महिन्यात डिलीट केले जातील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kpcylq