Full Width(True/False)

राजकुमार हिरानी यांचा मुलगा असल्याचं सांगून केली फसवणुक

मुंबई : अभिनयाच्या क्षेत्रामध्ये येऊन करिअर करणाऱ्या नवोदितांना मोठ्या निर्मिती संस्थेमध्ये अथवा मोठ्या दिग्दर्शकाकडे काम मिळवून देतो असे आश्वासन देत त्यांची फसवणूक होण्याच्या घटना अनेकदा घडतात. जेव्हा संबंधितांना आपल्या नावाने फसवणूक केली जाते, हे जेव्हा कळते तेव्हा ते जाहीरपणे या गोष्टी सांगतात आणि लोकांना सावध राहण्याचा इशारा देतात. अशीच घटना प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक यांच्यासोबत घडली आहे. राजकुमार यांनी मुंबईतील अंधेरी येथील पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही अज्ञात व्यक्ती नवोदित कलाकारांना लक्ष्य करून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. अंधेरी पूर्व येथे राजकुमार हिरानी यांचे आर.एच. प्रॉडक्शन कंपनीचे ऑफिस आहे. राजकुमार हिरानी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ६६(क) व ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार,एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला राजकुमार हिरानी यांचा मुलगा असल्याची बतावणी करत अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना लक्ष्य केले. हा भामटा इन्स्टाग्रामवरून अशा नवोदित कलाकारांना संपर्क साधायचा आणि त्यांना राजकुमार हिरानी यांच्या आगामी सिनेमात काम मिळवून देण्याचे आश्वासन द्यायचा. इन्स्टाग्रामवरून दिली जाहिरात राजकुमार यांचा मुलगा असल्याची बतावणी करणाऱ्या या भामट्याने इन्स्टाग्रामवर एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये राजकुमार हिरानी ३ टीनएज नावाच्या सिनेमाची निर्मिती करत आहेत. त्यासाठी त्यांना कलाकारांची तातडीने गरज असल्याचे नमूद केले होते. इच्छुकांनी इन्स्टाग्राममार्फत संपर्क साधावा असेही म्हटले होते. इतकेच नाही तर या भामट्याने ही जाहिरात खरी वाटावी यासाठी हिरानंदानी यांच्या कार्यालयाचा पत्ता, त्यांचा ई-मेल आयडी देखील या जाहिरातीमध्ये नमूद केला होता. २० कोटींचे दाखवले आमिष केवळ इतकेच नाही ज्या कलाकाराची या सिनेमासाठी निवड होईल, त्याला २० कोटी रुपये मानधन मिळेल असे आमिषही भामट्याने दाखवले होते. दरम्यान, राजकुमार हिरानी यांच्या निर्मिती संस्थेमधील अधिकाऱ्यांना २ जुलै रोजी एका ई-मेलद्वारे या फसवणुकीची माहिती मिळाली. हा ई-मेल फसवणूक झालेल्या युवकाने कंपनीच्या ईमेल आयडीवर पाठवला होता. त्यानंतर अशाच पद्धतीचा आणखी एक मेल ६ जुलै रोजी मिळाला. त्यातही झालेल्या फसवणुकीची माहिती दिली होती. त्यामध्ये फसवणाऱ्या व्यक्तीचे नाव कबीर हिरानी असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, या प्रकारानंतर राजकुमार हिरानी यांनी अंधेरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या भामट्याविरोधात गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wIWZrb