Full Width(True/False)

संगीत, रिअॅलिटी शोनंतर आता अभिनयाकडे वळणार का? राहुल वैद्य म्हणतो....

० 'इंडियन आयडॉल' आणि 'बिग बॉस' या दोन्ही रिअॅलिटी शोमध्ये तू उपविजेता ठरला आहेस; विजेतेपद नेहमी हुलकावणी देतंय असं वाटतं का?- उपविजेता होणं; हे माझ्यासाठी लकी ठरतंय. काही स्पर्धक शो जिंकतात आणि स्पर्धक मनं जिंकतात. जो मनं जिंकतो; तो शर्यतीत शेवटपर्यंत राहतो. ट्रॉफी जिंकणं हा तुमचा उद्देश नक्कीच असावा. पण, प्रेक्षकांची मनं जिंकणं, त्यांचं प्रेम मिळवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. जे माझ्याबाबीत होतंय. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान आणि समाधानी समजतो. ० सर्वात जास्त कशाची भीती वाटते आणि 'खतरों के खिलाडी'च्या निमित्तानं त्यावर मात कशी केलीस?- मला साप आणि पाण्याची प्रचंड भीती वाटते. 'खतरों के खिलाडी'च्या निमित्तानं ती भीती काहीशी कमी झालीय. पहिलाच टास्क सापांबरोबर होता. तसंच इतर बहुतांश टास्कमध्ये पाणी होतं. या शोनं मला एक गोष्ट शिकवली. ती म्हणजे; सर्व काही आपल्या मनात आहे आणि मनाला स्थिर केलं की सगळं सोपं होऊन जातं. ० अभिनयाकडे वळण्याचा काही विचार?- अभिनयाच्या ऑफर्स मला वारंवार येत असतात. आगामी एका मालिकेसाठी मला मुख्य भूमिकेसाठी विचारलं होतं. पण, मी नकार दिला. कारण, मालिका करताना चित्रीकरणासाठी बराच वेळ द्यावा लागतो. ते मला जमलं नसतं. पण, सिनेमा किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनयाकडे वळायला आवडेल. ० आयुष्याच्या नव्या प्रवासाविषयी मनात काय सुरू आहे?- नव्या प्रवासासाठी मी नक्कीच उत्सुक आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि शुभाशीर्वाद माझ्याबरोबर आहेत; असं मी समजतो. 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये मी सहभागी तर झालो होतो; पण खरा 'खतरों के खिलाडी' मी आता लग्नानंतर बनवणार आहे. माझी पत्नी दिशामुळे माझ्या जीवनाला नक्कीच 'दिशा' मिळाली आहे. ० रिअॅलिटी शोमध्ये मुद्दाम नाट्य आणलं जातं, परीक्षकांना स्पर्धकांचं कौतुक करायला सांगितलं जातं या आरोपावर तुझं मत काय?- प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच रिअॅलिटी शो बनतात. त्यासाठी काही गोष्टी ट्विस्ट केल्या तर काय हरकत आहे? सरळ-साधा शो टीव्हीवर प्रक्षेपित झाला तर तो शो प्रेक्षक पाहतील का? निर्माते व्यावसायिकदृष्ट्या त्यांचा कार्यक्रम सजवण्याचा प्रयत्न करतात. पण, परीक्षकांना काय बोलावं आणि आणि बोलू नये; हे सांगणं आणि ते पूर्वनियोजित करणं चुकीचच आहे. ० संगीत क्षेत्रात तुझा पुढचा प्रवास कसा असणार आहे?- लॉकडाउनमुळे अनेक म्युझिक अल्बमचं काम थांबलं होतं. ते आता एक-एक करुन पूर्ण करतोय. यातील काही अल्बम चित्रितदेखील करायचे आहेत. तसंच मी मोठ्या प्रेक्षकसंख्येसमोर लाइव्ह सादरीकरण करण्याची वाट पाहतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ifb5eS