नवी दिल्ली. Soundmojis मुळे युजर्सचा मेसेजिंग चा अनुभव अधिक मजेशीर होईल यात शंका नाही. साउंडमोजी मेसेंजर चॅट्समध्ये शॉर्ट साउंड क्लिप पाठविण्याची परवानगी देतात. "टाळ्या वाजवण्यापासून ते ड्रमरोल आणि वाईट हास्यापासून, रेबेका ब्लॅक आणि टीव्ही कार्यक्रमांसारख्या कलाकारांच्या ऑडिओ क्लिपपर्यंत, युनिव्हर्सल पिक्चर्स 'F9, एनबीसी ,युनिव्हर्सल टेलिव्हिजनच्या ब्रूकलिन नाइन-नाइन, आणि नेटफ्लिक्स ब्रिडगर्टन चित्रपट यात समाविष्ट असल्याचे ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. वाचा: Soundmojis वापरण्यासाठी आपल्याला प्रथम मेसेंजरमध्ये चॅट्स सुरू कराव्या लागतील आणि नंतर smiley चिन्हावर टॅप करा. आता आपल्याला लाऊडस्पीकर चिन्ह निवडावे लागेल. तेथून आपण पुन्हा एकदा आपल्या आवडीचे साउंडमोजीचे पूर्वावलोकन करून Emoji पाठवू शकता. फेसबुकने जाहीर केले आहे की, संपूर्ण साऊंडमोजी लायब्ररी देखील सुरू करीत आहे, जिथे आपण भिन्न साउंडमोजी निवडू शकता. सोशल नेटवर्किंग जायंटने हे देखील जोडले की, नियमितपणे नवीन ध्वनी प्रभाव आणि प्रसिद्ध साउंड इफेक्त्ट लायब्ररी अपडेट करण्यात येईल. यात प्रत्येक साउंड हा इमोजीद्वारे दर्शविले जातो. व्हिज्युअल इमोजी तर सर्वांनाच आवडतातच , यात आता साउंड फीचर जोडण्यात आली आहे असेही फेसबुकतर्फे सांगण्यात आले. नवीन इमोजीच्या पुढील फेरीची मसुदा लिस्ट आज (१६ जुलै) रोजी जाहीर करण्यात आली. या लिस्टमध्ये एक डिस्को बॉल, वितळणारा हसरा चेहरा, कमी बॅटरी आणि विविध नवीन हातांचा आकार आहे. करोनामुळे नवीन इमोजीचे रोलआउट यावर्षी पुढे ढकलण्यात आले. सप्टेंबरमध्ये युनिकोड कन्सोर्टियमद्वारे लिस्ट निश्चित केली जाईल आणि नवीन इमोजी २०२१ मध्ये थोड्या उशीराच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kqz7pF