मुंबई: पॉर्नोग्राफी केसमध्ये अटक झालेल्या राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे दिवसेंदिवस राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होत असतानाच दुसरीकडे अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानं राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांना दिेलेल्या स्टेटमेंटमध्ये शर्लिन चोप्रानं राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शर्लिनचं म्हणणं आहे की, २०१९ मध्ये एकदा अचानक तिच्या घरी आला होता आणि तिच्यासोबत गैरवर्तन करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शर्लिनचा आरोप आहे की, राज कुंद्रानं तिला बळजबरीनं किस केलं होतं. ज्यामुळे ती घाबरून गेली होती. न्यायालयानं बुधवारी झालेल्या सुनावणीत राज कुंद्राच्या जामिन अर्जाची याचिका फेटाळली. तर मुंबई उच्च न्यायालयात त्याच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी २९ जुलैला म्हणजे आज होणार आहे. पण या दरम्यान शर्लिन चोप्रानं केलेल्या या आरोपांमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. शर्लिननं मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचला आपलं स्टेटमेंट दिलं आहे. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार शर्लिनं एप्रिल २०२१ रोजी लैंगिक शोषणाच्या विरोधात एफआयआरही दाखल केली होती. शर्लिन चोप्रानं तिच्या तक्रारीत २७ मार्च २०१९ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये शर्लिननं म्हटलंय, 'राज कुंद्रानं माझ्या बिझनेस मॅनेजरला एका प्रस्तावासाठी फोन केला होता. २७ मार्च २०१९ रोजी झालेल्या एका बिझनेस मिटिंगनंतर राज कुंद्रा अचानक माझ्या घरी आला. आमच्यात टेक्स्ट मेसेजवर काही वाद झाला होता.' शर्लिननं दावा केला आहे की, त्यानंतर राज कुंद्रा तिच्या घरी गेला होता आणि त्यानं तिला जबरदस्तीनं किस करायला सुरुवात केली. शर्लिननं त्याला धक्का देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. शर्लिनचं म्हणणं आहे की, या प्रसंगानंतर ती खूप घाबरली होती. म्हणाली, 'मला कोणत्याही विवाहित पुरुषाशी अफेअर ठेवायचं नव्हतं किंवा मला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफही एकमेकांत मिसळू द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी राजला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उत्तरादखल त्यानं मला शिल्पा शेट्टीसोबत त्याचं नातं ठीक नसल्याचं म्हटलं होतं. तसेच जेव्हा तो घरी असतो तेव्हा अनेकदा त्रासलेला असतो असंही त्याचं म्हणणं होतं.' शर्लिन पुढे म्हणाली, 'मी राजला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी त्याला हे सर्व थांबवण्यास सांगत होते. मी खूप घाबरले होते. पण तो काहीच ऐकून घेत नव्हता. अखेर मी त्याला धक्का देऊन बाथरुमच्या दिशेने पळून गेले होते.' दरम्यान पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केली. त्यानंतर त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा दावा आहे की, पॉर्न फिल्म बनवण्याच्या धंद्याचा राज कुंद्रा मास्टर माईंड आहे. त्याच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. याप्रकऱणी राजच्या व्यतिरीक्त त्याची बायको आणि अन्य काही लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zQajMf