Full Width(True/False)

'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?' गरोदरपणावरून ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला निंबाळकरचं उत्तर

मुंबई- मराठी अभिनेत्री आणि युट्युबर म्हणून ओळख मिळवणारी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. एप्रिल महिन्यात उर्मिलाने ती गरोदर असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोबतच ती गरोदरपणातील काही फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु, गेल्या काही महिन्यात उर्मिलाला तिच्या फोटोंवर नकारात्मक कमेंटचा देखील सामना करावा लागला. या सगळ्या कमेंटना उर्मिलाने आता उत्तर दिलं आहे. स्त्री असून आपण दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात सहभागी होत नाही, असं म्हणत उर्मिलाने खंत व्यक्त केली. उर्मिलाने तिचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं, ''आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?', 'एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’ मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट मला स्त्रीयांनीच पाठवल्यात. स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रियांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील तेवढे टिपून घ्या, या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा नववा महिनासुद्धा संपायला आता काही दिवसच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.' अशी पोस्ट करत उर्मिलाने तिला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सुनावलं आहे. उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमस्ते याच्यासोबत विवाह केला होता. उर्मिलाने 'दुहेरी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय उर्मिलाने 'दिया और बाती हम', 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेतही झळकली होती. यासोबतच उर्मिलाने 'संगीत सम्राट' मालिकेचं सूत्रसंचालन केलं होतं. त्यानंतर उर्मिलाने स्वतःचं युट्युब चॅनेल सुरू केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ThBlN1