Full Width(True/False)

'सतत कौतुक केल्यानं काहीच फायदा होत नाही'; रिअॅलिटी शोबद्दल पुन्हा सोनूनं व्यक्त केलं मत

मुंबई : सध्या विविध वाहिन्यांवरून रिअॅलिटी कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. त्या कार्यक्रमांमधील परीक्षक अनेकदा स्पर्धकांचे अवास्तव कौतुक करतात, त्याबद्दल प्रसिद्ध गायक याने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सा रे गा मा आणि इंडियन आयडल या कार्यक्रमांमध्ये सोनू निगम परीक्षक म्हणून काम केले होते. सोनू निगमने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ' सर्वसाधारणपणे आपल्याकडे परीक्षक हे स्पर्धकांना काही तरी शिकवण्यासाठी असतात. परीक्षकांनी स्पर्धकांना प्रामाणिकपणे त्यांचे मत सांगणे अपेक्षित असते. सतत स्पर्धकांचे कौतुक करण्यात काहीच अर्थ नसतो. परीक्षकांनी सतत स्पर्धकांचे वा वा म्हणत कौतुक करून कसे चालेल? असे करणे म्हणजे मुलांना बिघडवण्यासारखेच नाही का. परीक्षकांना मुलांना बिघडवायचे नाही तर घडवायचे आहे. परीक्षक सतत स्पर्धकांचे कौतुक करत राहिले तर स्पर्धकांना ते कधी चुकले आणि ते कधी बरोबर होते हेच मुळी कळणारच नाही.' दरम्यान, इंडियन आयडल १२ संदर्भात अमित कुमार यांनी सांगितले होते की, या कार्यक्रमात गेल्यावर निर्मात्यांनी मला स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते. अमित कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी इंडियन आयडल १२ चा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि परीक्षक मुंतशिर यांनी कार्यक्रमाची बाजू घेत अमित कुमार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी निर्मात्यांनी हा वाद थांबवावा असे आवाहन केले होते. तसेच सोनू निगमने अमित कुमार यांची बाजू घेतली होती. तो म्हणाला होता की, किशोर कुमार यांची गाणी आजही कुणी शंभर टक्के गाऊच शकत नाही. त्यांचे पुत्र अमित कुमार हे देखील एक थोर व्यक्ती आहेत. त्यांनी या सिनेमासृष्टीमध्ये आपल्यापेक्षा जास्त वर्षे काम केले आहे. च्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि संयमी आहेत. या सगळ्या वादावर ते स्वतःहून काहीच बोलणार नाही. ते बोलत नाहीत, याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. इंडियन आयडलच्या टीमने हा वाद आता संपवावा असे आवाहन मी करतो.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xSe0AD