Full Width(True/False)

रेडमीचा ‘हा’ फोन धुमाकूळ घालणार, मिळणार तब्बल २०० मेगापिक्सलचा कॅमेरा

नवी दिल्ली : रेडमीचा अपकमिंग Redmi Note 11 Pro 5G बाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. या सीरिजला लाँच होण्यास वेळ असला तरीही आता या स्मार्टफोनचा लूक ऑनलाइन लीक झाला आहे. वाचाः LetsGoDigital ने ग्राफिक डिझाइन Technizo Concept सोबत भागीदारी अंतर्गत अधिकृत युट्यूब चॅनेलवर नोट ११ प्रो ५जीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चीनी टेक दिग्गज शाओमीच्या अपकमिंग स्मार्टफोन्सचे कॉन्सेप्ट रेंडर शेअर करण्यात आले आहे. पुढून पाहताना फोन प्रमाणे दिसतो. यात डिस्प्लेवर मध्यभागी एक पंच-होल सेल्फी सेंसर आहे. तर डिस्प्लेच्या चारही बाजूला पातळ बेझल्स आहेत. नोट १० प्रो आणि नोट ११ प्रोच्या रियर पॅनेलमध्ये मात्र स्पष्ट फरक दिसून येतो. रियर पॅनेलबद्दल सांगायचे तर ब्रँडिंगसोबत ५जीला पॅनेलच्या डाव्या बाजूला लिहिण्यात आले आहे. रियर पॅनेलवर वरती डाव्या बाजूला एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. दोन मोठे इमेज सेंसर आणि एक छोटा सेंसर आहे. म्हणजेच, तिसरा सेंसर ब्लॅक आणि व्हाइट/मॅक्रो सेंसर असू शकतो. तर पहिले दोन्ही सेंसर समान असण्याची शक्यता आहे. सध्या कॅमेऱ्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, रेडमी नोट ११ प्रो मध्ये रियरला सॅमसंगद्वारे बनवण्यात आलेला २०० मेगापिक्सलचा सेंसर मिळू शकतो. वाचाः दरम्यान, हे एक कॉन्सेप्ट रेंडर आहे. अद्याप डिव्हाइसचा अधिकृत लूक समोर आलेला नाही. तसेच, रेडमी नोट ११ प्रो ला पुढील वर्षी मार्च २०२२ मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zaN3bt