मुंबई: महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान झालंय. अनेक भागात पाणी साचून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुराचे पाणी जरी ओसरले असले; तरी तेथील परिस्थिती अजूनही सुधारली नाही. या पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी जनजागृतीचं काम हाती घेतलं आहे. अनेक कलाकार आर्थिक मदत करताना दिसत आहेत.अभिनेत्री यांनी देखील पूरग्रस्तांना तब्बल १० कोटींची मदत जाहीर केली आहे. दरड कोसळलेल्या आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणातील लोकांना मदत करण्यासाठी चहूबाजूंनी मदतीचे हात पुढे येत आहेत. दिपाली सय्यद यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागातील रग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेत तिथल्या नुकसानीची पाहणी केली आहे. पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेत ' हे सर्व भयंकर आहे. नागरिकांचं बोलणं ऐकूण अंगावर काटा येतोय. लोकांचे संसार उध्वस्त झालेत. काही उरलं नाहीए. माहित नाही देव अजून किती परिक्षा घेणार आहे', अशा शब्दांत दिपाली यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेव्हाही केली होती मदत...यापूर्वी देखील दिपाली यांच्या संस्थेनं २०१९मध्ये आलेल्या पूरानंतक कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत केली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली होती. यासोबतच पूरपरिस्थितीचे संकट ओढावलेल्या पूरग्रस्तांच्या १००० मुलीच्या विवाहाची जबाबदारी अभिनेत्री दिपाली सय्यद फाऊंडेशननं घेतली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3C2x5Tk